AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTP न मिळाल्याने अडकली गॅस बुकिंग? फोनमधील या 5 सेटिंग्स ठीक करताच मिळू शकतो एलपीजी सिलिंडरचा मेसेज

अनेकदा एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतरही मोबाइलवर ओटीपी मिळण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी मोबाइलमध्ये काही सेटिंग्स ठीक केल्यास तुम्हाला ओटीपी मिळू शकतो. हे सेटिंग्स कोणकोणते आहेत, ते जाणून घ्या..

OTP न मिळाल्याने अडकली गॅस बुकिंग? फोनमधील या 5 सेटिंग्स ठीक करताच मिळू शकतो एलपीजी सिलिंडरचा मेसेज
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2026 | 2:50 PM
Share

जर तुम्ही एलपीजी सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येत नसेल, तर घाबरून जाऊ नका. गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहकांच्या तक्रारी समोर येत आहेत की, बुकिंगदरम्यान ओटीपी उशिरा मिळत आहे किंवा काहींना ओटीपी मिळतच नाहीये. यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे. कारण ओटीपीशिवाय सिलिंडरची बुकिंग पूर्ण होऊ शकत नाही. परंतु प्रत्येक वेळी ओटीपी न मिळण्यामागचं कारण एलपीजी कंपनी किंवा सर्व्हर नसतो. अनेकदा ही समस्या थेट तुमच्या मोबाइलच्या काही सेटिंग्सशी संबंधितही असू शकते. फोनमधल्या काही छोट्या चुकांमुळे ओटीपी मिळण्यात अडथळा येतो. जर तुम्हीसुद्धा एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग ओटीपीशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त आहात, तर आधी तुमच्या फोनमधील हे पाच सेटिंग्स आवर्जून तपासून पहा..

नेटवर्कची समस्या

एलपीजी सिलिंडर बुकिंगदरम्यान ओटीपी न येण्यामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे खराब मोबाइल नेटवर्क. अनेकदा युजर्स अशा परिसरात असतात, जिथे नेटवर्क कमकुवत असतो किंवा इंटरनेट योग्यरित्या काम करत नाही. अशा वेळी गॅस कंपनीकडून पाठवलेला ओटीपी उशिराने पोहोचतो किंवा काही वेळा ओटीपी येतच नाही. विशेषकरून ट्रॅफिकच्या वेळी सर्व्हर आणि नेटवर्क दोन्हींची गती धीमी होते. यामुळे सर्वांत आधी तुम्ही मोबाइल नेटवर्क तपासून पहा आणि गरज पडल्यास मोबाइल Airplane Mode (एअरप्लेन मोड) वर टाकून पुन्हा नेटवर्क रिफ्रेश करा.

DND ऑन असल्याने ओटीपी मिळण्यात अडथळा

अनेक स्मार्टफोन्समध्ये ‘डू नॉट डिस्टर्ब’चं (DND) फीचर ऑन राहतं. या फीचरमुळे फोनवर येणारे कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन्स रोखले जाऊ शकतात. त्यामुळे एलपीजी सिलिंडर बुकिंगचा ओटीपी मेसेजसुद्धा ब्लॉक होऊ शकतो किंवा उशिराने मिळू शकतो. अनेकांना हेदेखील माहीत नसतं की त्यांच्या फोनमध्ये डीएनडी फीचर ऑन आहे. त्यामुळे गॅस बुकिंगदरम्यान तुम्हाला ओटीपी मिळत नसेल तर फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन DND फीचर बंद करून पहा.

एलपीजी कंपनीचा सर्व्हर डाऊन

अनेकदा समस्या ग्राहकांच्या फोनमध्ये नसून एलपीजी कंपनीच्या सर्व्हरमध्ये असते. एकाच वेळी जेव्हा अनेकजण सिलिंडर बुक करत असतात, तेव्हा कंपनीचा सर्व्हर तांत्रिक अडचणींमुळे डाऊन होऊ शकतो. यामुळे ओटीपी पाठवण्याची प्रक्रिया प्रभावित होते. अशा स्थितीत बुकिंग प्रक्रिया मध्येच थांबते आणि युजरला ओटीपीला जात नाही.

सिमकार्डमधील मेसेज बॉक्स फुल होणं

अनेकजण त्यांच्या फोनमधील जुने SMS डिलिट करत नाहीत. यामुळे मोबाइलचा मेसेज इनबॉक्स भरून जातो आणि नवीन मेसेज येण्यास अडचण होते. एलपीजी बुकिंगचा ओटीपीसुद्धा याच कारणामुळे इनबॉक्समध्ये दिसत नाही किंवा Hidden होतो. त्यामुळे फोनमधील SMS बॉक्स क्लिअर करून थोडी जागा ठेवा. यामुळे ओटीपी आणि नवीन मेसेज योग्य वेळी तुम्हाला मिळतील.

स्पॅम फिल्टरमध्ये ओटीपी जाणं

स्मार्टफोन्समध्ये स्पॅम फिल्टरचा (Spam Filter) एक फीचर असतो, जो काही मेसेज आपोआप स्पॅम किंवा जंक फोल्डरमध्ये पाठवतो. यामुळे ओटीपीसुद्धा चुकून स्पॅमध्ये जातो. त्यामुळे ओटीपी न मिळाल्यास एकदा स्पॅम किंवा जंक एसएमएसचा फोल्डर आवर्जून तपासून पहा.

जर तुम्हाला ऑनलाइन ओटीपीची समस्या सतत जाणवत असेल, तर तुम्ही ऑफलाइन किंवा इतर काही पद्धतीनेही गॅस सिलिंडर बुक करू शकता. आयव्हीआर कॉल, व्हॉट्स अप मेसेज आणि एजन्सी व्हिजिटद्वारेही तुम्ही सिलिंडर बुक करू शकता.

Follow Us
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता...
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता....
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला...
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला....