mAadhaar App सेवांसाठी नोंदणीकृत मोबाईलचा करा वापर, अनोंदणीकृत मोबाईल धारकांना नाही मिळणार सुविधा 

जर तुम्ही मोबाइल फोनमध्ये mAadhaar App  वापर करू इच्छिता तर त्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक (Registered Mobile Number)  असण्याची गरज नाही भारतात राहणारा कोणताही व्यक्ती त्याच्या स्मार्ट फोन मध्ये mAadhaar App इंस्टॉल करू शकतो आणि त्याद्वारे फायदा घेऊ शकतो

 mAadhaar App सेवांसाठी नोंदणीकृत मोबाईलचा करा वापर, अनोंदणीकृत मोबाईल धारकांना नाही मिळणार सुविधा 
mAadhaar App

जर तुम्ही मोबाइल फोनमध्ये mAadhaar App  वापर करू इच्छिता तर त्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक (Registered Mobile Number)  असण्याची गरज नाही भारतात राहणारा कोणताही व्यक्ती त्याच्या स्मार्ट फोन मध्ये mAadhaar App इंस्टॉल करू शकतो आणि त्याद्वारे फायदा घेऊ शकतो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)  नुसार जर तुम्ही नोंदणीकृत नसलेल्या मोबाईलवर mAadhaar App चा वापर करत असाल तर तुम्ही फक्त काही मोजक्या योजनांचा लाभ घेऊ शकता तर दुसरीकडे नोंदणीकृत मोबाईल धारकाला सर्व सुविधांचा लाभ मिळतो की ज्या सदर ॲप मध्ये उपलब्ध आहेत

अनोंदणीकृत वापर करते ठराविक सेवांचा लाभ घेऊ शकतात

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या माहितीनुसार तुमच्या अनोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे mAadhaar App मध्ये ठराविक सेवांचा तुम्हाला लाभ घेता येईल या योजना अत्यंत मोजक्या असतील इतर सेवांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही UIDAI द्वारे देण्यात येणाऱ्या रेप्रिंत ऑर्डर आधार नोंदणी केंद्राची माहिती आधारचा पडताळा QR कोड स्कॅनिंग याच सेवांचा तुम्हाला लाभ घेता येईल विशेष बाब म्हणजे अनोंदणीकृत मोबाइल मधील mAadhaar App इन्स्टॉल करण्यासाठी जो ओटीपी पाठवण्यात येईल तो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे

त्यामुळे, mAadhaar App चा वापर त्याच मोबाईल धारकांना करता येईल यांचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असेल जर तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरत असलेल्या मोबाईल मधील mAadhaar App चा वापर करत असाल तर तुम्हाला सर्व  सुविधा उपलब्ध होतील यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या मोबाईल मधील mAadhaar App वापर करू शकता

सर्व स्मार्ट फोन वर mAadhaar App चा वापर

mAadhaar App सर्व स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा वापर संबंधित स्मार्टफोन धारकाला करता येतो हे ॲप अँड्रॉइड आणि iOS मोबाईल ला सपोर्ट करते जर तुम्हाला  iPhone मध्ये mAadhaar App चा वापर करायचा असेल तर iPhone, iOS 10.0 या व्हर्जनचा असायला हवा नसेल तर तो अपडेट करावा लागेल.

भारत सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI)  2010 मध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी आधार अनिवार्य केले आहे. आधार कार्ड 12 आकड्यांचा एक बायोमेट्रिक डॉक्यूमेंट (Biometric Documents) आहे, जे नागरिकांची वैयक्तिक माहिती सरकारच्या  डेटाबेसमध्ये स्टोअर करते. सबसिडी आणि अन्य योजनांसाठी हे कार्ड महत्वपूर्ण ठरते. तसेच अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी, ओळख पटविण्यासाठी या कार्डची आवश्यकता असते.

संबंधित बातम्या : 

सोनेरी ऑफर, स्वस्तात मिळवा सोने, ही संधी पुन्हा नाही 

डिजिटल आधार: एकाच अ‍ॅपमध्ये पाच प्रोफाईल लिंक, दाखवा कधीही अन् कुठेही!

Published On - 11:22 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI