Mahindra : घरासमोर ऐटीत उभी करा दमदार चारचाकी, महिंद्रा बोलेरोवर मोठी सूट..24 तासात घरबसल्या डिलिव्हरी..

Mahindra : दमदार आणि जानदार महिंद्रा बोलेरो आता आणखी सवलतीत घरी घेऊन येता येणार आहे..

Mahindra : घरासमोर ऐटीत उभी करा दमदार चारचाकी, महिंद्रा बोलेरोवर मोठी सूट..24 तासात घरबसल्या डिलिव्हरी..
बोलेरोवर मोठी सवलत
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Nov 12, 2022 | 4:49 PM

नवी दिल्ली : महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) ही दमदार एसयुव्ही आहे. या चारचाकीवर सर्वच जण फिदा आहे. ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही या चारचाकीची क्रेझ (Craze)आहे. ओबडधोबड रस्ता असो वा गुळगुळीत महामार्ग, सर्वच रस्त्यावर बोलेरोचं अधिराज्य चालतं. तर ही चारचाकी आता तुम्हाला अजून सवलतीत (Discount) मिळणार आहे.

आता तुम्ही म्हणाल कंपनी एवढा सवलतीचा पाऊस का पाडत आहे. तर या कंपनीने महिंद्रा बोलेरोचं नवीन व्हर्जन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बोलेरोचा आधीचा संपूर्ण स्टॉक विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा स्टॉक लवकरात लवकर संपविण्यासाठी बेलोरोवर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांना तब्बल 42,000 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे .ही ऑफर या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत असेल.

या कालावधीत तुम्हाला ही दमदार चारचाकी ऐटीत घरासमोर उभी करता येणार आहे. त्यासाठई घरबसल्या ऑनलाईन बुकिंगची ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या चारचाकीचा स्टॉक लवकरात लवकर संपण्याची आशा आहे.

बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला 24 तासात घरपोच ही कार पोहचवण्यात येणार आहे. आता यापेक्षा आणखी कोणती ऑफर ग्राहकाला हवी. एकतर सवलत दुसरं घरासमोर थेट चारचाकी येणार आहे.

ग्राहकांना कर्जासाठी कोणत्याही बँकेकडे जाण्याची गरज नाही. स्वतः कंपनीचे डिलिव्हरी अधिकारी, एजंट तुमच्याकडे कर्जासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घरी येतील. तुम्ही केवळ कर्जासंबंधीची कागदपत्रे त्यांना द्यायची. त्यामुळे कर्ज सुविधाही मिळेल.

महिंद्रा बोलेरो चारचाकीची किंमत सध्या 6.4 लाख रुपयांनी सुरुवात होते. ऑनरोड ही चारचाकी 7.5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु, डिस्काऊंट मुळे ही चारचाकी केवळ 6 लाख रुपयांना खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें