तुमचं नाव बदललं तर क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम, कर्ज मिळण्यात अडचणी?

CIBIL | नावात बदल केल्यास सर्व कागदपत्रांवर तशी दुरुस्ती करा. तसेच बँका आणि इतर संस्थांना तशी माहितीही द्या. अन्यथा नाव बदलल्यानंतर कागदोपत्री तशा सुधारणा न केल्यास त्याचा थेट परिणाम सिबिलमधील तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.

तुमचं नाव बदललं तर क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम, कर्ज मिळण्यात अडचणी?
तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. हा स्कोअर जितका जास्त तितके जास्त कर्ज तुम्हाला मिळते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

नवी दिल्ली: आपल्याकडे लग्न झाल्यावर अनेकदा मुलींच्या नावात बदल होतो. तर इतर लोक अन्य काही कारणांमुळे स्वत:चे नाव किंवा आडनाव बदलतात. नाव बदलण्याची ही प्रक्रिया फारशी किचकट नसली तरी त्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो. कारण नावात बदल करताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. हा स्कोअर जितका जास्त तितके जास्त कर्ज तुम्हाला मिळते.

त्यामुळे नावात बदल केल्यास सर्व कागदपत्रांवर तशी दुरुस्ती करा. तसेच बँका आणि इतर संस्थांना तशी माहितीही द्या. अन्यथा नाव बदलल्यानंतर कागदोपत्री तशा सुधारणा न केल्यास त्याचा थेट परिणाम सिबिलमधील तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.

सिबिलमधील बऱ्याच गोष्टी तुमच्या नावावर अवलंबून असतात. तुम्ही कर्ज घेणार असाल तर त्यामध्ये सिबिल हा घटक सर्वात महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे तुम्ही नाव बदलल्यानंतर सिबिलला माहिती न दिल्यास तुमची रिपेमेंट हिस्ट्री, अकाऊंट नंबर, क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो या सर्व गोष्टी नष्ट होऊ शकतात.

नाव बदलल्यामुळे नेमका काय परिणाम होतो?

क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा नाही, हे ठरते. त्यामुळे सिबिलवर योग्य नाव असले पाहिजे. नावात तफावत आढळल्यास बँका तुम्हाला कर्ज देण्यास नकार देतात. त्यामुळे नावात बदल झाल्यानंतर बँकेत सुधारित कागदपत्रे सादर करावीत.

क्रेडिट ब्युरोला माहिती द्या

तुम्ही नाव बदलल्यानंतर क्रेडिट ब्युरोलाही तशी माहिती द्या. यासाठी तुम्ही सिबिलला ईमेल पाठवू शकता. त्यानंतर सिबिल तुमच्याकडून संबंधित कागदपत्रांची मागणी करेल. या सगळ्याची पूर्तता झाल्यानंतर सिबिलवर तुमच्या नावात बदल केला जाईल.

इतर बातम्या:

Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना

CIBIL स्कोअर चांगला ठेवण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी करा

‘या’ पाच गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा बँका तुम्हाला कधीच कर्ज देणार नाहीत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI