NECC कडून एक अंडं केवळ 3.95 रुपये, मग देशभरात अंड्याची किंमत वाढतीच, कारण काय?

राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (NECC) ने एका अंड्याचा दर हा 3.95 रुपये निश्चित केला आहे. मात्र तरीही बाजारात एका अंड्याची किंमत ही सहा रुपये इतकी आहे. (egg price Increasing in all over India)

NECC कडून एक अंडं केवळ 3.95 रुपये, मग देशभरात अंड्याची किंमत वाढतीच, कारण काय?
संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (NECC) ने एका अंड्याचा दर हा 3.95 रुपये निश्चित केला आहे. मात्र तरीही बाजारात एका अंड्याची किंमत ही सहा रुपये इतकी आहे. याचे प्रमुख कारण कोरोना असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना काळात प्रथिने (Protein) मिळावे यासाठी अनेकजण अंड्याची खरेदी करत आहे. पण लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे अंड्यांचा पुरवठा फारच कमी झाला आहे. त्यामुळे अंड्यांचे दर वेगाने वाढताना दिसत आहे. (NECC suggests egg price Rs 3.95 Why egg price Increasing in all over India reason behind)

कोइम्बतूरमधील नामक्कल (Namakkal) हा देशातील सर्वात मोठा पोल्ट्री हब मानला जातो. या ठिकाणी अंडी आणि कुक्कुटपालन संबंधित बरीच उत्पादन होतात. त्यानंतर याच ठिकाणाहून संपूर्ण उत्तर भारतात त्याचा पुरवठा केला जातो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र यांसह इतर उत्तर राज्यात नामक्कलमधूनच अंड्यांचा पुरवठा केला जातो.

NECC कडून अंड्याचा दर निश्चित 

गेल्या एप्रिल महिन्यापासून अंड्यांच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. एप्रिलमध्ये 100 अंड्यांची किंमत ही 435 रुपये इतकी होती. मात्र त्यानंतर त्यात काही प्रमाणात घट झाली. यानंतर NECC ने एका अंड्यांचा दर हा 3.95 पैसे इतका निश्चित केला. ज्यामुळे 100 अंडी ही 395 रुपयांना मिळत होती. पण जर आपण नामक्कलपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अंड्यांच्या किंमतीचा विचार केला तर या ठिकाणी अंड्यांची किरकोळ किंमत ही 500 ते 600 रुपयांवर गेली आहे. म्हणजे दिल्लीत 100 अंड्यांचा भाव हा 180 रुपये इतका आहे.

अंड्यांच्या किंमतीत विक्रमी नोंद

गुवाहाटी शहराने देशभरातील अंड्यांच्या किंमतीत विक्रमी नोंद केली आहे. कोरोनामुळे या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन अंड्यांची किंमत ही 16 रुपये इतकी आहे. काही दिवसांपूर्वी हा दर 12 रुपये इतका होता. या ठिकाणी अंड्याच्या एका क्रेटची किंमत 220 रुपये एवढी आहे. एका अंड्याच्या क्रेटमध्ये 30 अंडी असतात.

दिल्ली किंवा गुवाहाटीसारख्या राज्यात अंड्यांची किंमत वाढण्यामागील सर्वात मोठे कारण कोरोना असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाकाळात अनेक लोक हे प्रोटीनसाठी अंडी खात आहेत. यामुळे अंड्यांची मागणी वाढली आहे. पण लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे हा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील फरकामुळे अंड्यांच्या किंमतीतही मोठा फरक दिसून येत आहे.

डिझेलच्या किंमती वाढल्या

कोलकातामध्येही अंड्यांच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. कोरोना कालावधीमध्ये डॉक्टरांकडून भरपूर प्रमाणात प्रथिने खाण्याचा सल्ला दिला जातो. अंडी हे प्रोटीन मिळवण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय मानला जातो. त्यामुळे अनेकजण अंड्यांची खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे, लॉकडाऊन आणि डिझेलच्या किंमतीतील दरवाढीचा परिणाम वाहतुकीच्या खर्चावर दिसून येत आहे. याचा थेट परिणाम अंडी किंवा फळांवर दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे केवळ महत्त्वाच्या गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. पण त्याच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत.

4 वरुन 8 रुपयांवर दर

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी अंड्याचे दर प्रति नग हा 4 रुपये इतका होता. मात्र आता या अंड्यांची किंमत ही 6-7 रुपयांवर पोहोचली आहे. गुवाहाटीमध्ये तर एक अंड हे 8 रुपयांना विकले जात आहे. उन्हाळ्यात अंड्यांचा खप कमी होतो. उष्णतेमुळे अनेकजण अंडी खात नाहीत. मात्र कोरोनामुळे उन्हाळ्यातही अंड्यांचा खप प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

तसेच जर आपण कोलकाताचा विचार केला तर संपूर्ण शहरात 80 लाख अंड्यांचा खप होत होता. आता मात्र हाच खप 1.1 कोटी इतका झाला आहे. अंड्यांच्या मागणी वाढली असली तरीही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधून पुरवठा होत नाही. त्याशिवाय चिकन फीडही महाग झाले आहे, त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा अंड्यांच्या किंमतींवर दिसून येत आहे. कोलकातामध्ये ओडिशाहून अंड्यांचा पुरवठा होता. मात्र कोरोना निर्बंधांमुळे ओडिशा बंद आहे. यामुळे अंड्यांचा पुरवठा खंडित झाला आहे. (NECC suggests egg price Rs 3.95 Why egg price Increasing in all over India reason behind)

संबंधित बातम्या : 

Petrol Diesel Price | मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

1 जूनपासून 6 नियम बदलणार, सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम?

HDFC होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा; शाखेत न भेट देताही होणार सर्व कामे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI