Rules Change : 1 जूनपासून होतील हे मोठे बदल, तुमच्या खिशाला अशी बसेल झळ

Rules Change : 1 जूनपासून होणारे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करतील. एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत मोठे बदल होऊ शकतात. अजून काय होऊ शकतात बदल..

Rules Change : 1 जूनपासून होतील हे मोठे बदल, तुमच्या खिशाला अशी बसेल झळ
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 7:45 PM

नवी दिल्ली : मे महिना संपायला आता काही दिवस उरले आहेत. त्यानंतर जून महिना (June Month) सुरु होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात काही ना काही बदल (Rule change from 1 June) होतात. या बदलाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. कदाचित बदलामुळे तुमच्या किचनचे बजेट वाढेल. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच जाणून घ्या, काय होतील बदल आणि त्याचा तुमच्या खिशावर, बजेटवर किती पडेल फरक. गॅस सिलेंडरच्या किंमती, सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत (CNG, PNG Price) मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आता तीन दिवसांची काय बदल झाले, ते समजेल.

घरगुती गॅसच्या किंमती सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅसच्या किंमतीत मोठा बदल करतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलाचे वारे वाहते. LPG गॅसच्या किंमती पहिल्या दिवशी निश्चित होतात. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅसधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात झाली होती. तर घरगुती गॅस, 14 किलोच्या गॅसच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची कपात झाली होती.

CNG-PNG च्या किंमतीत बदल घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत जसा बदल होतो, तसाच बदल CNG-PNG च्या किंमतीत होतो. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबई शहरांसाठी CNG-PNG च्या भावात बदल करतात. एप्रिल मध्ये दिल्ली आणि मुंबईत CNG-PNG च्या किंमतीत कपात झाली होती. पण मे महिन्यात सर्वसामान्यांन कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे चाकरमान्यांचे लक्ष आता एक तारखेकडे लागले आहे. यावेळी भावात कपात होते की दरवाढ होते, हे स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

इलेक्ट्रिक व्हेईकल्स महाग 1 जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होऊ शकते. 1 जूननंतर इलेक्ट्रिक बाईक अथवा स्कूटर खरेदी करायची असले तर तुम्हाला अधिक किंमत मोजावी लागेल. 21 मे रोजी याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II सबसिडी रक्कमेत बदल केला आहे. त्यात कपात केली आहे. 10,000 रुपये प्रति kWh केलं आहे. पूर्वी ही रक्कम 15000 रुपये प्रति kWh होती. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्सची किंमत 25,000 ते 35,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

100 दिवसांत 100 दावे केंद्रीय बँकेने देशातील सर्वच बँकांना 100 दिवसांत 100 दावे हे अभियान सुरु करण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या 100 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 100 खात्यांच्या वारसदारांचा शोध घेण्यात येत आहे. या दावे न केलेल्या खात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वारसदारांचा शोध घेऊन त्यांना ही रक्कम परत करणे बँकांन अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या वाडवडिलांची नावे आहेत का, याची माहिती घेण्यासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

Non Stop LIVE Update
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.