आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी करा स्मार्ट गुंतवणूक, या टिप्स येतील कामी

International Men's Day | आज जागतिक पुरुष दिन आहे. हा दिवस जगभरातील जवळपास 100 हून अधिक देशात साजरा केल्या जातो. या दिवशी तुम्ही पण स्वतःला गिफ्ट देऊ शकता. कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या पुरुषाला भविष्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला या योजनेतील गुंतवणूक अर्थभान देणारी ठरु शकते.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी करा स्मार्ट गुंतवणूक, या टिप्स येतील कामी
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 11:04 AM

नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : आज जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येतो. पुरुषाला त्याच्या जबाबदारीचे भान असणं आवश्यक आहे. कुटुंब हे त्यासाठी सर्वात महत्वाचे असते. कुटुंबाच्या सुखात तो त्याचे सूख शोधतो. त्यांची काळजी घेणे, त्यांचा आनंद जपणे हे त्याच्यासाठी आद्यकर्तव्य असते. पुरुष दिन असले तरी पुरुषाला जबाबदारीतून पळ काढता येत नाही. उलट या दिवशी त्याला जबाबदारीचे अजून भान असणे आवश्यक आहे. त्यामुळे या दिवशी गुंतवणूकीचा संकल्प करणे सर्वात चांगले आहे. पुरुषांनी त्याच्या कमाईतून बचत करणे आणि ही रक्कम गुंतवणूक करणे आवश्यक आहे. हे अर्थभान, पुरुषाच्या खांद्यावरील भविष्यातील जबाबदारीचे ओझे कमी करण्यासाठी मदत करते. या योजनांमध्ये त्याची गुंतवणूक स्मार्ट ठरु शकते.

हे आहेत गुंतवणूकीचे पर्याय

संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पुरुष खाद्यांवर पेलतो. तर पत्नी ही कुटुंबाची काळजी घेते. कुटुंबाला आकार आणि संस्काराची मोठी जबाबदारी तिच्यावर असते. भविष्यातील वाढता खर्च, अनपेक्षित खर्च याची तजवीज करण्यासाठी त्याने अगोदरच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, विमा यामधील गुंतवणूक कुटुंबाच्या फायद्याची ठरेल.

हे सुद्धा वाचा
  1. शेअर बाजार – स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक जोखिमीची असली तरी ही गुंतवणूक फायदेशीर ठरते. शेअरची योग्य निवड, तज्ज्ञांचा सल्ला, अभ्यास केला तर ही गुंतवणूक मालामाल करु शकते. वार्षिक 15-18 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. गेल्या अनेक वर्षांत शेअर बाजार उंचावला आहे. त्याची घौडदौड सुरुच आहे. लवकरच बाजार विक्रम करण्याची शक्यता आहे.
  2. म्युच्युअल फंड – शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची वाटत असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. बाजारावर आधारीत ही गुंतवणूक 10 ते 17 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते. फंडमध्ये पण अनेक प्रकार आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, ईएलएसएस हा पण चांगला पर्याय ठरु शकतो. SIP आणि एकदाच रक्कम गुंतवणूक करणे असे दोन पर्याय आहेत. ग्राहकांना कर सवलत पण मिळते.
  3. Digital Gold – भारतात सोने हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. अनेक वर्षांपासून भारतीय लोक सोन्यात गुंतवणूक करत आले आहे. सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. सोन्याचे दाग-दागिने खरेदी करण्यापेक्षा आता डिजिटल गोल्डचा पण चांगला पर्याय आहे. या गुंतवणुकीवर तर चांगला परतावा पण मिळतो.
  4. गोल्ड बाँड, Gold ETF – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली. या योजनेत जोरदार परतावा मिळाला आहे. व्याज पण मिळते. गोल्ड बाँडमधील गुंतवणूक महाग वाटत असेल तर ऑनलाईन गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड आहे. हा स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विक्री करता येतो. ग्राहकाकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही गोल्ड ईटीएफ खरेदी करु शकता.
  5. डिजिटल सोने – डिजिटल गोल्ड हे सॉलिड गोल्ड आणि पेपर गोल्ड यांचे मिश्रण आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स डिजिटल सोने खरेदीसाठी मदत करतात. ग्राहक यामध्ये केव्हाही खरेदी-विक्री करु शकतो. गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून हे सोने खरेदी करता येते. गोल्ड फंड हा एकप्रकारचा म्युच्युअल फंडच असतो. यामध्ये घरबसल्या तुम्ही फिजिकल गोल्ड न खरेदी करता गुंतवणूक करु शकता. हे गोल्ड फंड, गोल्ड ईटीएफमध्येच गुंतवणूक करतात.
  6. विमा पॉलिसी- प्रत्येक जण आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध जागी गुंतवणूक करतो. खिशावर फार बोजा पडू द्यायचा नसेल तर विमा पॉलिसी केव्हाही मदतीला धावून येऊ शकते. बाजारात अनेक विमा योजनांचे पर्याय उपलब्ध आहे. तुमच्यासाठी योग्य विमा पॉलिसी निवडून तिचा नियमीत हप्ता जमा करणे आवश्यक आहे. घर, कार, आरोग्य आणि जीवन विमा घेणे आवश्यक आहे.
Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.