Petrol Diesel Price Today : पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर!

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून येत आहे.

Petrol Diesel Price Today : पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर!
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 9:00 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून येत आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.11 पैसे इतकी आहे.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

डिझेलचा दर प्रति लिटर 102.89 पैसे आहे. आता पेट्रोल 34 पैशांनी महाग झाले आहे. तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. पावर पेट्रोल 116.02 पैसे आहे. पेट्रोल 130 रुपये प्रती लिटरपर्यंत जाऊ शकते असं बोलले जात आहे. महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडत चालले आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. या महिन्यात केवळ 12 दिवसांत पेट्रोल दर 3.48 पैशांनी महागले आहे, तर डिझेल दरात 4.04 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

दररोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या काही आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

(Petrol Diesel Price Today 20 October 2021)

Non Stop LIVE Update
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.