दोन सख्ख्या भावांना एकाचवेळी पीएम आवास योजनेचा लाभ मिळू शकतो का? जाणून घ्या नियम
दोन सख्ख्या भावांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळू शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला, तर मग या योजनेचे नियम काय सांगतात, ते जाणून घेऊया.

आपलं स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकजण स्वप्न पाहतो. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार गरीब आणि गरजू लोकांसाठी मदत करते. 2025 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा (PM Awas Yojana) उद्देश ‘हाऊसिंग फॉर ऑल’ म्हणजेच सर्वांसाठी पक्की घरे उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत चालते.
या योजनेतून आतापर्यंत लाखो कुटुंबांना फायदा झाला आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, दोन सख्ख्या भावांना एकाच वेळी या योजनेचा लाभ मिळू शकतो का? चला, याबद्दल योजनेचे नियम काय सांगतात, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
पीएम आवास योजनेचे नियम काय आहेत?
या योजनेचा मुख्य उद्देश कुटुंबाला पक्के घर देणे आहे. योजनेच्या नियमानुसार, एका कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचा समावेश होतो.
जर दोन्ही भाऊ एकत्र राहत असतील :
जर दोन सख्खे भाऊ एकाच कुटुंबात एकत्र राहत असतील, तर त्यांना एकाच वेळी या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, फक्त एका भावाच्या नावावरच अर्ज करता येतो आणि त्यालाच योजनेचा लाभ मिळू शकतो.
जर दोन्ही भाऊ वेगवेगळे राहत असतील :
जर दोन सख्खे भाऊ वेगवेगळे राहत असतील आणि त्यांचे परिवार स्वतंत्र असतील, तर ते दोघेही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, यासाठी त्यांना योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जर दोन्ही भाऊ सर्व अटी पूर्ण करत असतील, तर ते स्वतंत्रपणे अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या नियमांचा सोपा अर्थ असा आहे की, कुटुंबाची व्याख्या ही ‘पती, पत्नी आणि अविवाहित मुले’ अशी आहे. जोपर्यंत दोन भाऊ एकत्र एकाच कुटुंबात राहतात, तोपर्यंत त्यांना स्वतंत्रपणे लाभ घेता येणार नाही. पण जर त्यांनी त्यांचे कुटुंब वेगळे केले असेल आणि ते स्वतंत्र राहत असतील, तर त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार योजनेचे नियम नक्की तपासा. यामुळे तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
