पोस्टाच्या MIS, SCSS आणि मुदत ठेवीला ताबडतोब करा बँक खात्याशी लिंक करा; अन्यथा अडकरणार व्याजाची रक्कम!

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 12, 2022 | 7:52 PM

Post Office Savings Scheme : पोस्ट ऑफिस बचत योजनेतील व्याजाचे पैसे मिळविण्यासाठी खातेदारांना आपली सर्व खाती सर्व पोस्टाचे बचत खाते अथवा बॅंक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खात्याशी लिंक करण्यासाठी, खातेधारकाला (account holder) रद्द केलेल्या चेकसह ईसीएस फॉर्म भरावा लागेल. त्यासोबत बँक खात्याचे पासबुक, एमआयएस, एससीएसएस आणि टीडीचे पासबुकही द्यावे लागेल. हा नवा नियम […]

पोस्टाच्या MIS, SCSS आणि मुदत ठेवीला ताबडतोब करा बँक खात्याशी लिंक करा; अन्यथा अडकरणार व्याजाची रक्कम!
भारतीय पोस्ट
Image Credit source: TV9

Post Office Savings Scheme : पोस्ट ऑफिस बचत योजनेतील व्याजाचे पैसे मिळविण्यासाठी खातेदारांना आपली सर्व खाती सर्व पोस्टाचे बचत खाते अथवा बॅंक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खात्याशी लिंक करण्यासाठी, खातेधारकाला (account holder) रद्द केलेल्या चेकसह ईसीएस फॉर्म भरावा लागेल. त्यासोबत बँक खात्याचे पासबुक, एमआयएस, एससीएसएस आणि टीडीचे पासबुकही द्यावे लागेल. हा नवा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू झाला आहे. पोस्ट ऑफिसने एका परिपत्रकात म्हटले आहे की, व्याजाचे पैसे फक्त आणि फक्त पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खात्यात जमा केले जातील. जर व्याजाचे पैसे (Interest payments)काढले गेले नाहीत, तर ते पोस्ट ऑफिस बचत खात्यात हस्तांतरित (Transferred)केले जातील किंवा फक्त चेकद्वारे काढले जाऊ शकतात.

अशा परिस्थितीत, पोस्टाच्या ग्राहकांना पोस्ट ऑफिसची सर्व खाती पोस्ट बचत खाते किंवा बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. बँक खात्याशी लिंक करण्यासाठी, खातेधारकाला रद्द केलेल्या चेकसह ECS फॉर्म भरावा लागेल. बँक खाते पासबुक, MI SCSS आणि TD पासबुक देखील द्यावे लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये ही सर्व कागदपत्रे दिल्यानंतर पोस्ट ऑफिसचे बचत खाते या सर्व योजनांशी जोडले जाईल आणि व्याजाचे पैसे खात्यात जमा होत राहतील.

MIS/SCSS/TD मध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते कसे जोडावे

यासाठी खातेधारकाला SB-83 फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म स्वयंचलित हस्तांतरण सुविधेसाठी भरला आहे. या फॉर्मच्या मदतीने, MIS, SCSS आणि TD खाती पोस्ट ऑफिस बचत खात्याशी जोडली जातात. हा फॉर्म भरून पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या पासबुकाची पडताळणीही करते. सरकारने अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेत 7.6%, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 7.4% आणि PPF वर 7.1% व्याज दिले जात आहे. अल्प बचत योजनेत व्याज तिमाही आधारावर दिले जाते.

PPF आणि सुकन्या समृद्धी सारख्या योजनांचा समावेश

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के, 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खात्यावर 5.80 टक्के, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खात्यावर 5.5 टक्के, सार्वजनिक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.80 टक्के, किसान विकास पत्रावर 6.90 टक्के व्याज मिळत आहे. या सर्व योजनांना सरकार पाठिंबा देत असल्याने, गुंतवणुकीची ही सर्व साधने कोणत्याही जोखमीशिवाय आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींची चिंता करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिस दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योजना देखील चालवते. यामध्ये PPF आणि सुकन्या समृद्धी सारख्या योजनांचा समावेश आहे. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा आहे ते या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या नवीन नियमांनुसार, आता पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेवींचे व्याजाचे पैसे रोख स्वरूपात मिळणार नाहीत, या पैश्यासाठी पोस्टाच्या ठेवीदारांना आपाली सर्व खाती पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा आपल्या बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

इतर बातम्या : 

भरधाव डंपारने बाप-लेकाला संपवले; सांगलीतील आष्टा मार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

Raj Thackeray Thane News: साहेबांना एक पायरी चढता येत नव्हती, वसंत मोरेंनी भरसभेत राज ठाकरेंच्या तब्येतीचाही वृत्तांत दिला, नेमकं काय झालंय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI