नवी दिल्ली : टपाल खात्याच्या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकते. केंद्र सरकारने (Central Government) जानेवारी ते मार्च महिन्यात काही अल्पबचत योजनांवरील (Small Saving Schemes) व्याजदरात (Interest Rate) वाढ केली आहे. यामध्ये किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही योजना खूप लोकप्रिय आहे. केंद्र सरकारने किसान विकास पत्रमधील गुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही संधी फायद्याची ठरेल.