Indian Railway : धावत्या रेल्वेत ही चूक पडेल महागात! हे कृत्य येईल अंगलट, होऊ शकते 1 वर्षाची शिक्षा

Indian Railway : धावत्या रेल्वेत ही चूक तुम्हाला महागात पडू शकते..

Indian Railway : धावत्या रेल्वेत ही चूक पडेल महागात! हे कृत्य येईल अंगलट, होऊ शकते 1 वर्षाची शिक्षा
तर होईल शिक्षाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 8:38 PM

नवी दिल्ली : देशात दररोज शेकडो रेल्वे दूरचा पल्ला गाठतात. या रेल्वेत दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांना सुविधा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासन काम करते. बिनदिक्कतपणे प्रवासासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) राबते. प्रवासात काही प्रवाशी खोडकरपणा करतात. त्यांच्यामुळे इतर प्रवाशांना तर मनस्ताप सहन करावाच लागतो. पण रेल्वे प्रशासनालाही वेळापत्रकात बदल करावा लागतो. त्याचा लांबपल्याच्या गाड्यांना फटका बसतो. यामुळे ट्रेनचे (Train) वेळापत्रक कोलमडते. अशा प्रवाशांवर रेल्वे प्रशासन कडक कारवाई करते.

काही प्रवाशी छोट्या कारणासाठी अथवा गरज नसताना ही रेल्वेमध्ये चेन (Chain Pulling) ओढतात. त्यामुळे रेल्वे थांबते आणि पुढील प्रवासाचा खोळंबा होतो. विनाकारण रेल्वेत चेन ओढल्यास तो गुन्हा ठरतो. रेल्वेतील अलार्म चेन सिस्टिम ही केवळ अत्यावश्यक वेळेत ओढता येते. त्यासाठी खास नियम आहेत.

नाहक चेन ओढल्यास त्याचा मोठा फटका इतर प्रवाशांना बसतो. त्यांना गंतव्य स्थानी वेळेत पोहचता येत नाही. काहींनी त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तर काहींना अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वेच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा

भारतील रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 141 नुसार, नाहक आणि विनाकारण चेन ओढल्यास तो अपराध ठरतो. या नियमानुसार, एक वर्षाचा कारावास आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावते. तुमचा सहप्रवासी, मुलं, वृद्ध अथवा अपंग व्यक्ती स्टेशनवरच राहिला तर कारवाई टाळता येते.

तसेच अपघात झाल्यास, अपघाताबाबत आगाऊ माहिती मिळाल्यास, इतर आपत्कालीन परिस्थितीत चेन ओढल्यास कारवाई होत नाही. धावत्या रेल्वेत चेन ओढण्यासाठीचे सबळ कारण तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे विनाकारण रेल्वेची चेन ओढू नका.

तुम्ही विनाकारण चेन ओढल्यास त्याचा परिणाम इतर सुपरफास्ट आणि विशेष रेल्वेंच्या वेळापत्रकावर पडतो. तसेच त्या मार्गावरील इतर रेल्वे सेवाही प्राभावित होते. देशात दररोज कोणत्या ना कोणत्या मार्गावर चेन ओढण्याची घटना होते. त्याचा परिणाम सेवेवर होतो.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.