दोन रुपयांचं नाणं मिळवून देणार पाच लाख रुपये, तुमच्याकडे जुनी नाणी आहेत का?

Rare Coins | अनेकदा आपण आपल्याकडे असणाऱ्या जुन्या नाण्यांकडे दुर्लक्ष करतो. त्या नाण्यांची खरी किंमत माहिती नसल्याने आपण अगदी फुकटातही ती नाणी इतरांना देऊन टाकतो.

दोन रुपयांचं नाणं मिळवून देणार पाच लाख रुपये, तुमच्याकडे जुनी नाणी आहेत का?
रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, बँकांना ग्रामीण भाग आणि खेड्यांमध्ये नाणी वितरीत करण्यासाठी 10 रुपयांचा अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता मिळेल. बँकांनी ग्राहकांना नाण्यांचा व्यवस्थित पुरवठा करावा, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

नवी दिल्ली: दुर्मिळ नाणे आणि नोटांचा संग्रह करून ठेवणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमी नाही. यापैकी अनेकजण दुर्मिळ नाण्यांसाठी लाखो रुपये मोजायला तयार असतात. त्यामुळे तुमच्याकडे एखादे जुने नाणे असेल, तुम्हाला अचानक लॉटरी लागू शकते.सध्या या दुर्मिळ वस्तूंच्या बाजारपेठेत दोन रुपयांच्या जुन्या नाण्यासाठी चांगलाच भाव दिला जात आहे. हे नाणे तुम्हाला पाच लाख रुपये मिळवून देऊ शकते. हे नाणे फार पूर्वी चलनात होते आणि आता त्यापैकी मोजकीच नाणी शिल्लक आहेत.

अनेकदा आपण आपल्याकडे असणाऱ्या जुन्या नाण्यांकडे दुर्लक्ष करतो. त्या नाण्यांची खरी किंमत माहिती नसल्याने आपण अगदी फुकटातही ती नाणी इतरांना देऊन टाकतो. मात्र, सध्या बाजारपेठेत एक आणि दोन रुपयाच्या जुन्या नाण्यांची प्रचंड चलती आहे. ही नाणी विकत घेण्यासाठी संग्राहक वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार आहेत. तुमच्याकडे असे एखादे नाणे असेल तर तुम्ही क्विकर या संकेतस्थळावर जाऊन त्याची किंमत जाणून घेऊ शकता.

दोन रुपयांचे नाणे कसे असले पाहिजे?

क्विकर या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संग्राहकांना 1995 सालचे दोन रुपयांचे नाणे हवे आहे. या नाण्याच्या एका बाजुला भारताचा नकाशा आणि त्यामध्ये राष्ट्रध्वज आहे. हे नाणे तुमच्याकडे असेल तर तुम्ही लाखोंची कमाई करु शकता. क्विकरच्या माहितीनुसार, या नाण्यासाठी संग्राहक 5 लाख रुपयेही मोजायला तयार आहेत. याशिवाय, स्वातंत्र्यपूर्व काळातील राणी व्हिक्टोरियाची छबी असलेल्या एका रुपयाच्या चंदेरी नाण्यासाठी दोन लाख रुपये मिळू शकतात. सम्राट जॉर्ज पंचम याची छबी असलेल्या 1918 मधील एक रुपयाच्या नाण्यासाठी तुम्हाला 9 लाख रुपये मिळू शकतात.

ही नाणी विकण्यासाठी काय कराल?

तुमच्याकडे दुर्मिळ जुनी नाणी असतील तर https://www.quikr.com/home-lifestyle/rare-indian-coin-gurgaon/p/354498004 या लिंकवर जा. याठिकाणी आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता व इतर तपशील भरुन रजिस्ट्रेशन करा. या संकेतस्थळावर Buy Now आणि Make an Offer असे दोन पर्याय असतात. तुमच्याकडील नाण्याचा फोटो वेबसाईटवर अपलोड करावा. त्यानंतर ज्यांना हे नाणे विकत हवे असेल ते तुमच्याशी थेट संपर्क साधतील.

संबंधित बातम्या:

जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम

नोटबंदींमध्ये बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?, वाचा काय आहे व्हायरल सत्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI