AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरडी खात्यावर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता; 10 रुपयांपासून सुरू करता येते गुंतवणूक

रिकरिंग डिपॉझिट अर्थात आवर्ती ठेव खात्यात ग्राहकांकडून जे काही पैसे जमा केले जातात, ते किमान 2.50 टक्क्यांपासून 8.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवून देऊ शकतात.

आरडी खात्यावर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता; 10 रुपयांपासून सुरू करता येते गुंतवणूक
आरडी खात्यावर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 9:09 PM
Share

नवी दिल्ली : काही गोष्टी वगळता रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी खाते हे फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडी खात्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. पैशांच्या गुंतवणूकीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एफडीपेक्षा आरडी खात्यावर अधिक सुविधा मिळतात. ज्या लोकांना नियमित उत्पन्न मिळते, त्या लोकांसाठी आरडी खात्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे. आरडी खात्यात दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते आणि ठेवीची मुदत देखील निश्चित केली जाते. या खात्यावर आपल्याला 2.50 ते 8.50 टक्के व्याज मिळू शकते. एफडीप्रमाणे आरडी खात्यावरही व्याज उपलब्ध आहे. परंतु यामध्ये मासिक प्रीमियम ठेवीची सुविधा दिली जाते. (RD account can earn interest up to 8.5 per cent; The investment can start from Rs 10)

रिकरिंग डिपॉझिट अर्थात आवर्ती ठेव खात्यात ग्राहकांकडून जे काही पैसे जमा केले जातात, ते किमान 2.50 टक्क्यांपासून 8.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवून देऊ शकतात. किमान ठेवीच्या रकमेबद्दल बोलल्यास तुम्ही एफडीच्या तुलनेत अगदी 10 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये 10 रुपयांची गुंतवणूक करून आरडी खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पैसे जमा करण्याचा अवधी

आरडी खात्यात पैसे जमा करण्याचा कालावधी 6 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत असू शकतो. यामध्ये प्रत्येक तिमाहीला चक्रवाढ व्याज मिळते. आरडीमध्ये मुदतीआधी किंवा अंशत: पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध नाही. तुमची इच्छा असल्यास तुम्ही हे खाते अचानक बंद करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला काही दंड भरावा लागेल.

ही बँक देत आहे सर्वाधिक व्याज

आरडी खात्यात जमा झालेल्या रकमेवर इंडसइंड बँक सर्वाधिक व्याज देत आहे. हे सामान्य खात्यावर (सामान्य व्याज दर) 7.25 ते 8.00 टक्के व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरडीवर 7.75 ते 8.50 टक्के व्याज मिळत आहे. त्याचप्रमाणे, जना स्मॉल फायनान्स बँक सामान्य खात्यावर 6.75 ते 8.50 टक्के व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.35 ते 9.10 टक्के व्याज देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य खात्यावर 6.25 ते 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 ते 8.00 टक्के व्याज देत आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँक सामान्य खात्यावर 5.75 ते 7.53 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 ते 8.03 टक्के व्याज देत आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सामान्य खात्यावर 6.40 ते 6.53 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.90 ते 7.15 टक्के व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसतर्फे सामान्य खाते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर समान ठेवण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस 5.80 टक्के व्याज देत आहे.

मोठ्या बँकांची स्थिती

मोठ्या बँकांविषयी बोलायचे झाल्यास स्टेट बँक सामान्य खात्यावर 5.00 ते 5.40 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.50 ते 6.20 टक्के व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक सामान्य खात्यावर 3.50 ते 5.35 आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.00 ते 5.85 टक्के व्याज देत आहे. एचडीएफसीकडून सामान्य खात्यावर 3.50 ते 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 6 टक्के व्याज दिले जात आहे. तसेच कोटक बँक सामान्य खात्यावर 4.40 ते 4.75 आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.90 ते 5.25 टक्के व्याज देत आहे.

अ‍ॅक्सिस बँक सामान्य खात्यावर 4.40 ते 4.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.65 ते 6.05 टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा सामान्य खात्यावर 3.70 ते 5.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.20 ते 5.75 टक्के व्याज देत आहे. पीएबी सामान्य नागरिकांना आरडी खात्यावर 4.40 ते 5.30 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.90 ते 5.80 टक्के व्याज देत आहे.

आरडी खात्याची वैशिष्ट्ये

1. यात ठराविक रक्कम जमा करण्याची गरज नाही. आपल्याला परवडेल तेवढी रक्कम घेऊन आपण गुंतवणूक सुरू करू शकतो.

2. ग्राहक स्वत:च्या आवडीनुसार ठेव कालावधी निवडू शकतो. कालावधीत 6 महिने ते 10 वर्षे असू शकतो. आरडीला एफडीइतकेच व्याज मिळते.

3. मुले किंवा अल्पवयीन मुलेसुद्धा आरडी खाते उघडू शकतात. त्यांच्या पालकांची कागदपत्रे घेतली जातात.

4. सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आरडी खात्यात अधिक व्याज दिले जाते

5. खातेधारक काही वेगळे शुल्क देऊन वेळेपूर्वी अंशत: पैसे काढू शकतो.

6. तुम्हाला तुमच्या आरडी खात्यावर कर्ज घेता येऊ शकते. तुम्ही तुमच्या खात्यातील जमा रक्कमेपैकी 80 ते 90 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता. (RD account can earn interest up to 8.5 per cent; The investment can start from Rs 10)

इतर बातम्या

जन्मकुंडलीतील नवग्रहांशी संबंधित समस्या दूर करतात रत्न, वापरण्याआधी असे तपासा खरे की खोटे ते

देवाच्या पूजेमध्ये जपमाळेचे बरेच महत्त्व; जाणून घ्या कुठल्या माळेने कुठल्या देवतेची पूजा करायची?

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.