वृषभ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून ‘या’ स्वभावगुणांची असते अपेक्षा; जाणून घ्या त्यांच्या अपेक्षा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jul 25, 2021 | 7:58 PM

वृषभ राशीचे लोक हट्टी, मूडी, आक्रमक आणि बुद्धिमान असतात. त्यांना ऐश्वर्य आणि आलिशान राहणीमान आवडते. महागड्या गोष्टींबद्दल त्यांना अधिक ओढ असते. ते महागडी वस्तू खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना उतावीळ स्वभावाचे म्हटले जाते.

वृषभ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून ‘या’ स्वभावगुणांची असते अपेक्षा; जाणून घ्या त्यांच्या अपेक्षा
वृषभ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून ‘या’ स्वभावगुणांची असते अपेक्षा

मुंबई : प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वत:चे असे वेगळे व्यक्तिमत्व असते आणि त्यानुसार ते लोक आपली सर्व कामे करतात. प्रत्येक राशीच्या लोकांचा स्वभाव देखील एकमेकांपेक्षा खूप वेगळा असतो. त्यामुळे ते इतर लोकांपेक्षा भिन्न असतात. आज आम्ही तुम्हाला त्या बारा राशीपैकी एका राशीच्या व्यक्तींविषयी माहिती देणार आहोत. ती रास म्हणजे वृषभ आहे. (Taurus people expect ‘Ya’ temperament from their partner)

स्वभावाने हट्टी, पण आवडीचे काम करण्यासाठी प्रचंड मेहनती

वृषभ राशीचे लोक हट्टी, मूडी, आक्रमक आणि बुद्धिमान असतात. त्यांना ऐश्वर्य आणि आलिशान राहणीमान आवडते. महागड्या गोष्टींबद्दल त्यांना अधिक ओढ असते. ते महागडी वस्तू खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांना उतावीळ स्वभावाचे म्हटले जाते. परंतु, कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशाप्रकारे ते समर्पित, वचनबद्ध आणि मेहनती लोक असतात. ते त्यांना आवडीची कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी दिवसरात्र काम करण्यास तयार असतात. त्यांना जे काही करायचे असते, त्यात त्यांना ‘परफेक्शन’शिवाय दुसरे काही नको असते. ते प्रचंड जिद्दी असतात. जेव्हा नात्याचा विषय येतो, त्यावेळी ते विश्वासार्ह आणि भरवशाचे मित्र असल्याचे नाते जपतात. त्यांच्या संभाव्य जीवन साथीदाराकडे कोणते स्वभावगुण असायला पाहिजेत, ते आपण या लोकांच्याच व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकून जाणून घेऊया.

संयम

वृषभ राशीचे लोक एखाद्यावर प्रेम करण्यात तसेच त्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवण्यास कधीही वेळ देण्यास तयार असतात. त्यांचे जीवनसाथी बनू पाहणाऱ्या तरुण-तरुणीने पुरेसा संयम बाळगला पाहिजे. या राशीच्या लोकांशी नाते जोडताना घाई करू नये.

सरळपणा

वृषभ लोकांना कुठलाही विषय चघळत बसणे आवडत नाही. ते प्रामाणिक, बोथट आणि साधेसरळ असतात. ते स्वत:सुद्धा आपल्या जीवनसाथीदाराकडून अशाच स्वभावाची अपेक्षा करतात. त्यांचा जोडीदार त्यांच्यासारखाच प्रामाणिक आणि सत्यवादी असायला पाहिजे.

कठोर परिश्रम करणारा

वृषभ लोकांना काम करायला खूप आवडते. ते ऐश्वर्य मिळवण्यासाठी कितीही तास काम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांचा जीवनसाथी देखील कामासाठी कटिबद्ध असावा. कमीतकमी काम करणारा अर्थात कामामध्ये टंगळामंगळ करणारा नसावा.

विश्वासार्ह

वृषभ राशीचे लोक आपला विश्वास बसणार नाही, इतक्या अधिक प्रमाणात विश्वासार्ह असतात. त्यांच्यावर नक्कीच कुणीही विश्वास ठेवू शकतो. त्यांचे जीवनसाथीसुद्धा तेवढेच विश्वासार्ह असले पाहिजेत. नातेसंबंध जपण्यासाठी एकमेकांप्रती एकनिष्ठ असले पाहिजेत. (Taurus people expect ‘Ya’ temperament from their partner)

इतर बातम्या

ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक जाळीत विषारी साप दिसला, महावितरण कर्मचाऱ्यांची तारांबळ

Video: हिमाचलमध्ये भयानक भूस्खलन, थरारक घटनेत क्षणार्धात लोखंडी ब्रीज कोसळला, 9 मृत्यू

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI