दररोज 3 जीबी डेटा हवाय? तर जिओचा ‘हा’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्या
तुम्हाला जर दररोज जास्त डेटाची गरज पडत असेल त्यात तुम्ही रिलायन्स जिओचे वापरकर्ते असाल तर जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळतो. चला तर या प्लॅनची किंमत आणि वैधता व फायदे जाणून घेऊयात...

तुम्ही जर रिलायन्स जिओचे प्रीपेड वापरकर्ते असाल, त्यात तुम्हाला जर रोज अधिक डेटाची गरज भासत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये कंपनी सर्वात स्वस्त किंमतीत 3 जीबी दैनिक डेटा देते. तर रिलायन्स जिओच्या 3 जीबी दैनिक डेटा असलेल्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत किती आहे आणि या प्लॅनमध्ये कोणते फायदे आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात. रिलायन्स जिओच्या दैनंदिन 3GB डेटा प्लॅनची किंमत 449 रूपये आहे. हा जिओचा सर्वात स्वस्त 3GB प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह हा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता.
यात दररोज 100 SMS मेसेज देखील मिळतात. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळतो, परंतु तुमचा फोन 5G-सक्षम असावा आणि तुम्ही कंपनीच्या 5G नेटवर्क क्षेत्रात असले पाहिजे. 449 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आहे. त्यासोबतच वापरकर्त्याला 3 जीबी दैनिक डेटा व प्लॅनमध्ये एकूण 84 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो.
या प्लॅनमध्ये नवीन जिओ होम कनेक्शनसह दोन महिन्यांची मोफत ट्रायल, तीन महिने जिओ हॉटस्टार आणि 50 जीबी क्लाउड स्टोरेजसह अतिरिक्त फायदे देखील मिळतात. या प्लॅनमध्ये 35 हजार 100 रुपयांच्या किमतीत गुगल जेमिनी प्रोचा ॲक्सेस देखील मिळतो, परंतु हा फायदा फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
महत्वाचं म्हणजे यामध्ये Jio Hotstar आणि Jio AI क्लाउड स्टोरेज फायदे मिळविण्यासाठी, तुम्ही ज्या Jio नंबरने रिचार्ज केले आहे त्याच नंबरने लॉग इन करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 84 दिवसांनंतर Google Gemini ऑफरचा फायदा घेणे सुरू ठेवायचे असेल, तर तुम्हाला कमीत कमी Reliance Jio च्या 349 रुपयांच्या अमर्यादित 5G प्लॅनसह रिचार्ज करणे सुरू ठेवावे लागेल.
