AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC चालू असतानाही पंखा चालवायचा का नाही? वाचा आणि स्वतः निर्णय घ्या

उन्हाळ्यात घरात AC किंवा कूलर लावला की गरमीपासून आराम मिळतो. पण मग एक प्रश्न हमखास पडतो तो म्हणजे AC चालू असताना पंखा पण लावावा का? याने डबल लाईट बिल येईल की थंडावा वाढेल? काही जण म्हणतात दोन्ही सुरू ठेवणं म्हणजे विजेचा आणि पैशांचा अपव्यय, तर काही म्हणतात यानेच खरी कूलिंग मिळते! मग नक्की खरं काय? हा साधा वाटणारा गोंधळ तुमच्याही मनात असेल, तर थांबा! AC सोबत पंखा चालवण्यामागचं विज्ञान आणि बचतीचं गणित तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतं. चला जाणून घेऊया!

AC चालू असतानाही पंखा चालवायचा का नाही? वाचा आणि स्वतः निर्णय घ्या
AC Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 4:50 PM
Share

उन्हाळा म्हणजे तापमानाचा कहर! त्यामुळे घरात AC किंवा कूलर चालू ठेवणं ही आता गरज बनली आहे. पण अनेकदा लोक एकाच गोंधळात अडकतात की AC लावताना पंखा सुरू ठेवावा का बंद करावा? काहीजण म्हणतात “हो, योग्य आहे” तर काही म्हणतात “नाही, योग्य नाही” मग नेमकं काय योग्य आहे?

तज्ज्ञांच्या मते : AC आणि पंखा दोघं एकत्र चालवल्यास उलट फायदा होतो. कारण AC मधून येणारी थंड हवा जड असते आणि ती सरळ खाली बसते. जर पंखा चालू असेल, तर ही थंड हवा खोलीभर सारखी पसरते. त्यामुळे थंडावा लवकर आणि सगळीकडे जाणवतो.

पंख्यामुळे तुम्हाला थोडक्याच तापमानातही थंड वाटतं. त्यामुळे तुम्ही AC १८–२० डिग्रीऐवजी २४–२५ डिग्रीवर ठेवू शकता. यामुळे AC ला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि त्याचा कंप्रेसर कमी वेळा सुरू होतो. याचा थेट परिणाम वीज वापरावर होतो.

कूलर वापरत असाल, तरीही पंखा उपयोगी ठरतो. विशेषतः मोठ्या खोलीत, कूलरची हवा फक्त एकाच दिशेने जाते. पंख्यामुळे ही हवा खोलीत समान रीतीने फिरते. त्यामुळे कूलरची थंड हवा अधिक प्रभावीपणे पोहोचते आणि स्पीड वाढवण्याची गरज कमी होते.

एसी किंवा कूलरसोबत पंख्याचा वापर केल्यास तुम्ही दर महिन्याला १० ते १५ टक्के वीज वाचवू शकता. एका अंदाजानुसार, हे दर महिन्याला सुमारे ५०० ते ८०० रुपयांपर्यंतची बचत करू शकते. वर्षभरात ही बचत हजारोंच्या घरात जाऊ शकते!

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.