नेटबँकिंगचा पिन आणि पासवर्ड सुरक्षित आहे ना? सायबर गुन्हेगार करती खाते रिकामे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Feb 13, 2022 | 9:16 AM

सायबर गुन्हेगार तुमच्या नेटबँकिंग, एटीएम इत्यादींचा पिन आणि पासवर्ड वापरुन तुम्हाला काही कळण्याच्या आतच तुमचे खाते रिकामे करु शकतात. त्यामुळे बँकिंग पिन आणि पासवर्डशी संबंधित काही गोष्टींची गुप्तता पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

नेटबँकिंगचा पिन आणि पासवर्ड सुरक्षित आहे ना? सायबर गुन्हेगार करती खाते रिकामे
नेटबँकिंग

गेल्या काही वर्षांपासून जग झपाट्याने आधुनिकीकरणाकडे वळून डिजिटल झाले आहे. त्याच पध्दतीने लोकांच्या विविध पध्दतीने सायबर गुन्हेगारांकडून (Cyber crime) फसवणुकीचे प्रकारदेखील वाढत गेले आहे. बँकेशी निगडीत सर्व कामे हे प्रत्यक्ष बँकेत जाउनच करावी लागत होती. परंतु जसे जसे आपण डिजिटलायझेशनकडे वळत गेलो तस आपली कामे अधिक सोपे व सुरळीत होत गेली. आता बँकेशी निगडीत बहुतेक सर्वच व्यवहार हे ऑनलाइन पध्दतीने होत आहेत. परंतु याचे जसे फायदे आहेत तसे दुष्परिणामही दिसून येत आहे. काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. अनेक गुन्हेगार नेटबँकिंग, (Netbanking) एटीएम आदींचा पिन आणि पासवर्ड (Password) वापरतात.

कोरोना महामारीच्या काळात लोक त्यांची बँकिंगशी संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने करतात. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत आहेत. देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गुन्हेगार लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांची बँक खाती काही मिनिटांत रिकामी करतात. यासाठी गुन्हेगार विविध पद्धती वापरतात. नेटबँकिंग, एटीएम इत्यादींचा पिन आणि पासवर्ड वापरुन चोरी केली जाते. त्यामुळे बँकिंग पिन आणि पासवर्डशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हे करायला विसरु नका

1) तुमचा पासवर्ड सरळमार्गी नको, तो काही प्रमाणात अवघड असणे आवश्यक आहे जेणेकरून इतरांना त्याचा अंदाज येणार नाही. तुम्ही यामध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष वर्ण (!, @, #, $, %, ^, &, * , ) वापरू शकता.

2) तुमचे नाव किंवा टोपणनाव, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, तुमच्या घराचा पत्ता किंवा चोराला तुमच्या पर्स किंवा वॉलेटमध्ये सापडलेली कोणतीही माहिती या माध्यमातून तुमचा पासवर्ड किंवा पिनचा सुगावा लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

3) तुमचा संगणक किंवा ई-मेल अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही जो पासवर्ड वापरला होता तोच पासवर्ड नेटबँकिंग व्यवहाराला वापरू नका.

4) वेबसाइटच्या साइन इनवर तुमचा लॉगिन आयडी किंवा पासवर्ड आपोआप तयार झाला असल्यास, तो पासवर्ड बदलून घ्यावा.

5) पहिल्यांदा लॉग इन केल्यानंतर तसेच महिन्यातून एकदा तरी तुमचा इंटरनेट बँकिंग पासवर्ड बदलले पाहिजे.

6) लॉगिन आणि इतर व्यवहारांसाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवा. यातून इंटरनेट बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा मिळत असते.

7) तुमच्याकडे एकापेक्षा जास्त इंटरनेट बँकिंग यूजर आयडी असल्यास, प्रत्येकासाठी वेगळा पासवर्ड वापरावा.

8) तुम्ही सायबर कॅफे किंवा कुठल्याही संगणकावरून आपले व्यवहार करत असल्यास, त्यानंतर तुमचा पासवर्ड बदला. जेव्हा तुम्ही सायबर कॅफेच्या कॉम्प्युटरमध्ये तुमचा ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकला असेल तेव्हा तो त्यावर ‘सेव्ह’तर होत नाही ना, याची काळजी घ्या.

9) तुम्हाला कुणाचाही फोन आल्यास आपला पासवर्ड किंवा ओटीपी त्याच्याशी शेअर करु नका.

संबंधित बातम्या : 

बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून ‘अशी’ करून घ्या आपली सुटका

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI