AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम

तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून बचाव करायचा असेल तर एसबीआय बँकेच्या ग्राहकांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावे, अशी सूचना दिली आहे.

SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा 'हे' काम
एसबीआय
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 12:17 PM
Share

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अ‌ॅलर्ट जारी केला आहे. जर तुमचेही एसबीआय बँकेत खाते असेल तर तुम्ही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून बचाव करायचा असेल तर एसबीआय बँकेच्या ग्राहकांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावे, अशी सूचना दिली आहे. जर एखाद्या बँकेच्या ग्राहकांनी पॅन आणि आधार जोडला नसेल तर त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे. येत्या 30 सप्टेंबर 2021 पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर अकाऊंट बंद होऊ शकते. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरपूर्वी पॅन आधार लिकं करुन घ्या, अशी माहिती देण्यात आली आहे.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

पॅन कार्डसह आधारला कसे लिंक कराल?

पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN <SPACE>12 अंकी आधार क्रमांक> <SPACE> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.

असे करा ऑफलाईन लिंक

पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल.

(SBI ALERT customers Link Aadhaar-PAN before THIS date Know steps to check)

संबंधित बातम्या : 

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

देशातील सर्वात मोठ्या सिगारेट कंपनीच्या बॉसच्या पगारात 47 टक्के वाढ, आता दररोज एवढे लाख मिळणार

LPG सिलिंडर ग्राहकांसाठी चांगली बातमी; इंडेन ग्राहकही आता भारत गॅस आणि एचपी सिलिंडर घेऊ शकतात, कसे ते जाणून घ्या

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.