AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तीन बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतोय चांगला परतावा; पहा किती आहे व्याजदर

Senior citizens special FD scheme भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय  बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर अधिक व्याजदर देण्यात येत आहे. बँकांच्या विविध योजनांतर्गंत हा लाभ वृद्धांना मिळत आहे.

'या' तीन बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतोय चांगला परतावा; पहा किती आहे व्याजदर
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 6:15 AM
Share

नवी दिल्ली :  Senior citizens special FD scheme भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय  बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेवर अधिक व्याजदर देण्यात येत आहे. कोरोना काळात जवळपास सर्वच बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याजात घट केली होती. मात्र वृद्धांना दिलासा मिळावा यासाठी भारतीय स्टेट बँकेने व्याज दरात कोणतीही कपात न करता आहे त्यापेक्षा अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेने देखील वृद्धांसाठी मुदत ठेव योजनेवरील व्याजदर वाढवले आहेत.

एसबीआय बँक

एसबीआयकडून ज्येष्ठ नागरिकांना मदुत ठेव योजनेवर 0.80 टक्के जादा व्याजदर देण्यात येत आहे. म्हणजेच जर सर्व सामान्य ग्राहकांसाठी बँकेकडून मुदत ठेव योजनेवर देण्यात येणारा व्याजदर 6 टक्के असेल तर त्यापेक्षा 0.80 टक्के वाढीव व्याज हे वृद्धांना देण्यात येते. सध्या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेवर 6.20 टक्के इतके व्याज देण्यात येत आहे. बँकेची ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेकडून खास वृद्धांसाठी गोल्डन इअर एफडी नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक बँकेमध्ये 5 किंवा दहा वर्षांची एफडी करू शकतात. या मुदत ठेवीवर वृद्धांना बँकेकडून 0.50 टक्के ज्यादा व्याजदर मिळतो. सोबतच बँकेच्या विविध ऑफर आहेत त्यातंर्गत देखील ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या वतीने 0.20 टक्के अतिरिक्त व्याजदर देण्यात येतो. बँकेची ही योजना एप्रिल 2022 पर्यंत मर्यादित आहे.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेच्या वतीने वृद्धांसाठी सीनिअर सिटीझन केअर नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वृद्धांना मुदत ठेवीवर 0.75 टक्के वाढीव व्याजदराने पैसे दिले जातात. जर जेष्ठ नागरिकांनी बँकेच्या या योजनेंतर्गंत एफडी केल्यास मुदत  ठेवीवर 6.25 टक्के एवढे व्याज देण्यात येते.

संबंधित बातम्या

क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

आता आयपीपीबीच्या अ‍ॅपवरून देखील करता येणार सिलिंडरची बुकिंग; जाणून घ्या काय आहे फायदा?

Online Fraud : ऑनलाइन व्यवहार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर सायबर ठग घेतील गैरफायदा

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.