अवघ्या 25 रुपयांना मिळणारे ‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास लखपती होण्याची संधी, वर्षभरात घसघशीत रिटर्न्स

Share Market | गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते.

अवघ्या 25 रुपयांना मिळणारे ‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास लखपती होण्याची संधी, वर्षभरात घसघशीत रिटर्न्स
शेअर मार्केट

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. अशावेळी आतापासूनच गुंतवणूक करुन चांगला फायदा पदरात पाडून घेण्याची संधी आहे.

गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात. मात्र, या समभागांमध्ये गुंतवणूक करताना जोखीम अधिक असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे असते.

ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group ) – 1,186% रिटर्न

ऑक्टोबर 2020 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपच्या समभागाची किंमत फक्त 5.5 रुपये इतकी होती. सध्या ती 71 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फक्त 1 वर्षात 1,186 टक्के परतावा मिळाला आहे. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडचे यापूर्वीचे नाव लायकोस इंटरनेट लिमिटेड होते. ही कंपनी डिजिटल मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते.

वारी रिन्यूएबल टेक्नोलॉजीज (Waaree Renewable Technologies) – 938% रिटर्न

या समभागाची किंमत ऑक्टोबर 2020 मध्ये 17.8 रुपये होती. सध्या या समभागाची किंमत 185 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फक्त 1 वर्षात 938 टक्के परतावा मिळाला आहे. वारी रिन्यूएबल्स टेक्नॉलॉजी लिमिटेड (डब्ल्यूआरटीएल) उर्जा क्षेत्रात काम करते. कंपनी अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. याशिवाय, कंपनी सौर उर्जेसंबधीच्या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करते.

गणेश हाउसिंग (Ganesh Housing) – 629% रिटर्न

गणेश हाऊसिंगच्या समभागाची किंमत ऑक्टोबर 2020 मध्ये 25 रुपये इतकी होती. आता या समभागाची किंमत 182 रुपये इतकी आहे. त्यामुळे एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 629 टक्के परतावा मिळाला आहे. गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड भारतातील रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी निवासी, व्यावसायिक, किरकोळ आणि टाउनशिप प्रकल्पांच्या जाहिरात आणि विकासात सामील आहे. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीकडे सुमारे 639.13 एकर जमीन होती. गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 1969 मध्ये झाली आणि कंपनीचे मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे.

रतनइंडिया इंफ्रास्ट्रक्चर (RattanIndia Infrastructure )- 697% रिटर्न

गेल्या सहा महिन्यांत Rattanindia Enterprises च्या शेअर्सनी गुंतवणूकादारांना नऊपट परतावा दिला आहे. या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना 800 टक्के फायदा करुन दिला आहे. 30 एप्रिलला Rattanindia च्या समभागाची किंमत 4.95 रुपये इतकी होती. मात्र, 4 ऑक्टोबरला या समभागाने 44.60 रुपयांची पातळी गाठली होती. याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 9 लाख रुपये इतके झाले आहे. Rattanindia चे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 6,164.92 कोटी इतके झाले आहे. Rattanindia Enterprises कंपनीचा पसारा औष्णिक उर्जा, रिन्यूएबल एनर्जी, ग्राहक वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरला आहे. या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत Rattanindia ची भांडवली बाजारातील कामगिरी खूपच उजवी आहे.

संबंधित बातम्या:

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI