‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; सहा महिन्यांत कमावले नऊपट पैसे

Share Market | 30 एप्रिलला Rattanindia च्या समभागाची किंमत 4.95 रुपये इतकी होती. मात्र, 4 ऑक्टोबरला या समभागाने 44.60 रुपयांची पातळी गाठली होती. याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 9 लाख रुपये इतके झाले आहे. Rattanindia चे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 6,164.92 कोटी इतके झाले आहे.

‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; सहा महिन्यांत कमावले नऊपट पैसे
पैसे कमवा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Oct 06, 2021 | 12:07 PM

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात Rattanindia Enterprises कंपनीच्या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या सहा महिन्यांत Rattanindia Enterprises च्या शेअर्सनी गुंतवणूकादारांना नऊपट परतावा दिला आहे. या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना 800 टक्के फायदा करुन दिला आहे. 30 एप्रिलला Rattanindia च्या समभागाची किंमत 4.95 रुपये इतकी होती. मात्र, 4 ऑक्टोबरला या समभागाने 44.60 रुपयांची पातळी गाठली होती. याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 9 लाख रुपये इतके झाले आहे. Rattanindia चे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 6,164.92 कोटी इतके झाले आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?

Rattanindia Enterprises कंपनीचा पसारा औष्णिक उर्जा, रिन्यूएबल एनर्जी, ग्राहक वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरला आहे. या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत Rattanindia ची भांडवली बाजारातील कामगिरी खूपच उजवी आहे.

कंपनीत गुंतवणूक करावी का?

गुंतवणूकदारांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्यावी. कंपनीची आर्थिक कामगिरी त्याच्या भांडवली बाजारातील कामगिरीशी जुळत नाही. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनमध्ये कंपनीची विक्री केवळ 1 कोटी रुपये झाली आहे. यामुळे कंपनीला 83 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर 2018 ते डिसेंबर 2020 या तिमाहीत कंपनीची विक्री शून्य झाली आहे. तरीही भांडवली बाजारात कंपनीच्या समभागाचा भाव वाढत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या 1.55 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 301.60 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें