AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Pan Link : .. तर यामुळे आधार-पॅन लिंक करण्यात अडचण, दंडापासून वाचण्याचा हा आहे उपाय

Aadhaar Pan Link : आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची मुदत आता जवळ आली आहे. त्यानंतर जोडणीसाठी दंड भरावा लागेल. काहींना हे दोन्ही कार्ड लिंक करताना ही अडचण सतावत आहे, त्यावर असा उपाय करता येईल.

Aadhaar Pan Link : .. तर यामुळे आधार-पॅन लिंक करण्यात अडचण, दंडापासून वाचण्याचा हा आहे उपाय
| Updated on: Jun 24, 2023 | 2:30 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय आयकर विभागाने पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक (Aadhaar Pan Link )करणे बंधनकारक केले आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली आहे. या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत. पण ज्यांना अत्यंत उशीरा जाग आली, त्यांना आता एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमुळे दोन्ही कार्ड लिंक करणे अवघड झाले आहे. आयकर विभागाने या समस्येवर एक उपाय सांगितला आहे. ही अडचण दूर झाली तरी अनेकांना दोन्ही कार्ड जोडता येतील. नाहीतर मुदत संपल्यानंतर त्यांना दंड भरुन जोडणी करावी लागणार आहे.

1 जुलैपासून इतका दंड इनकम टॅक्स अॅक्ट 1961 अंतर्गत पॅन कार्ड, आधार कार्डशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. 30 जून 2023 रोजीपर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जोडणी न झाल्यास पॅन कार्ड बंद होईल. या दोन्ही कार्डची जोडणी होण्यासाठी अनेकदा मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता ती वाढविण्यात येणे अशक्य आहे. ही मुदत संपल्यानंतर जोडणी करणाऱ्यांना 1 जुलैनंतर 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हे होईल नुकसान

  • पॅन-आधार लिंक न करण्याचे अनेक नुकसान
  • सर्वात अगोदर तुम्हाला विलंब केल्याबद्दल दंड भरावा लागेल
  • तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही रिफंड, परतावा मिळणार नाही
  • पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नाही
  • करदात्याकडून अधिक टीसीएस, टीडीएस वसूल करण्यात येईल

या कारणामुळे अडचण अनेक जण अंतिम मुदतपूर्वी हे दोन्ही कार्ड जोडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या एका चुकीमुळे त्यांचे दोन्ही कार्ड जोडण्यास अडचण येत आहे. आधार कार्डवरील, नाव, जन्मतारीख, लिंग अशी डेमोग्राफिक माहिती आणि पॅन कार्डवरील माहिती मिसमॅच होत आहे. ती जुळत नसल्याने दोन्ही कार्ड जोडण्यात अडचण येत आहे. पण या दोन्ही कार्डवरील ही माहिती एकसारखी केल्यास ही अडचण दूर होऊ शकते.

मग कसं करता येईल लिंक जर तुम्ही यापूर्वीच दोन्ही कार्डमधील नावातील चूक, जन्मतारीख आणि इतर चूका दुरस्त केल्या असतील तर तुमचे दोन्ही कार्ड लिंक करता येईल. तरीही अडचण येत असेल तर त्यावर प्राप्तिकर खात्याने एक उपाय सांगितला आहे. तुम्ही पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या केंद्रात ही अडचण दूर करु शकता. शुल्क भरुन बायोमॅट्रिक बेस्ट ऑथेंटिकेशन सुविधा मिळवू शकता.

अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.