स्पाइसजेटची विशेष ऑफर ! फक्त 999 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी; जाणून घ्या याबद्दल सर्व काही

थेट स्पाइसजेटच्या संकेतस्थळावर बुकिंग केल्याने ग्रॉफर्स(Grofers), मेफिन(Mfine), मेडिबुड्डी(Medibuddy), मोबीक्विक(MobiKwik) आणि द पार्क हॉटेल्स(The PARK Hotels)च्या वतीने विशेष ऑफरचाही फायदा मिळेल. (SpiceJet's special offer, Opportunity to travel by air for only Rs 999)

स्पाइसजेटची विशेष ऑफर ! फक्त 999 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी; जाणून घ्या याबद्दल सर्व काही
आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 3:02 PM

नवी दिल्ली SpiceJet Mega Monsoon Sale : भारतीय विमान कंपनी स्पाइसजेटद्वारे मेगा मॉन्सून सेलचे आयोजन केले गेले आहे. या सेलची 25 जूनपासून सुरूवात झाली आहे आणि 30 जूनपर्यंत चालू राहिल. विक्री अंतर्गत देशांतर्गत हवाई भाडे फक्त 999 रुपयांपासून सुरू होत आहे. 1 ऑगस्ट 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत सेल दरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर प्रवास करता येईल. (SpiceJet’s special offer, Opportunity to travel by air for only Rs 999)

या सेल अंतर्गत केवळ एक-मार्ग तिकिट बुकिंग करता येईल. हा लाभ फक्त थेट डोमेस्टिक उड्डाणांवर उपलब्ध आहे. थेट स्पाइसजेटच्या संकेतस्थळावर बुकिंग केल्याने ग्रॉफर्स(Grofers), मेफिन(Mfine), मेडिबुड्डी(Medibuddy), मोबीक्विक(MobiKwik) आणि द पार्क हॉटेल्स(The PARK Hotels)च्या वतीने विशेष ऑफरचाही फायदा मिळेल. तिकिट बुकिंग दरम्यान तुम्हाला फ्लाइट व्हाऊचर देखील मिळेल जे 1000 रुपयांपर्यंत असेल. हे बुकिंग तिकिटांच्या बेस रकमेच्या समान असेल. त्याचा फायदा 1 ऑगस्ट 2021 नंतर मिळू शकेल.

फ्री फाइट व्हाउचर्सचा लाभ कसा मिळेल

फ्री फाईट व्हाउचर्सची बुकिंगची वैधता 1000 रुपयांपर्यंत 1 जुलै ते 31 जुलै 2021 पर्यंत आहे. या तिकीटवर 1 ऑगस्ट ते 31 मार्च 2021 पर्यंत प्रवास करता येईल. याशिवाय तुम्ही केवळ 149 रुपयांमध्ये आपल्या आवडीचे सीट बुक करू शकता. याशिवाय स्पाइसमॅक्स सुविधेचा लाभ फक्त 799 रुपयात मिळू शकेल. याअंतर्गत प्रवाशाला अतिरिक्त लेगरूम, प्राधान्य सेवा, जेवण आणि पेय पदार्थांचा अतिरिक्त लाभ मिळतो.

तिकिट रद्द करण्याचीही सुविधा

या विक्रीचा फायदा कोणत्याही प्लॅटफॉर्मच्या मदतीने तिकिट बुकिंगवर उपलब्ध होईल. ग्रुप बुकिंग व इतर कोणत्याही ऑफरसह लाभ घेता येणार नाही. तिकीट बुकिंग केल्यानंतरही ते रद्द केले जाऊ शकते. प्रथम येणार्‍या, प्रथम प्राधान्य या तत्वावर कोणत्याही प्रवाशाला या सेलचा लाभ मिळेल.

या मार्गांचे भाडे 999 रुपये

999 रुपयांचे भाडे सर्वसमावेशक आहे. म्हणजे स्वतंत्रपणे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. या भाडे मार्गाविषयी बोलताना हैदराबाद-बेलागाम, बेलागम-हैदराबाद, चेन्नई-हैदराबाद, चेन्नई-बेंगलुरू अशा मार्गांचे भाडे 999 रुपयांपासून सुरू होत आहे. (SpiceJet’s special offer, Opportunity to travel by air for only Rs 999)

इतर बातम्या

ओबीसी आरक्षणावरुन 26 जून रोजी काँग्रेस-भाजप आमनेसामने, भाजप पाठोपाठ काँग्रेसचीही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

Third Wave : 50 लाख रुग्णांची शक्यता, 6,759 रुग्णालये, 12 हजार व्हेंटिलेटर्स, तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.