‘या’ बँकेत आपल्या मुलीच्या नावाने खातं उघडा, 30 सप्टेंबरपर्यंत मिळतोय दुप्पट फायदा

SSY scheme | तुम्ही कमीतकमी 250 रुपयांचे डिपॉझिट जमा करुन PNB बँकेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. या खात्यात तुम्ही दरवर्षी 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करु शकता. मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.

'या' बँकेत आपल्या मुलीच्या नावाने खातं उघडा, 30 सप्टेंबरपर्यंत मिळतोय दुप्पट फायदा
सुकन्या समृद्धी योजना
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 11:42 AM

नवी दिल्ली: देशातील मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी, या उद्देशाने मोदी सरकारने सुकन्य समृद्धी योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत बँकेत जमा होणाऱ्या पैशांवर कर लागत नाही. आता देशातील आघाडीची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांना एक खास सुविधा देऊ केली आहे. त्यानुसार बँकेत उघडल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी खात्यांसाठी विशेष लाभ दिला जाणार आहे. तुम्ही कमीतकमी 250 रुपयांचे डिपॉझिट जमा करुन PNB बँकेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. या खात्यात तुम्ही दरवर्षी 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करु शकता. मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. अशाप्रकारची जास्तीत जास्त दोन खाती उघडली जाऊ शकतात. या खात्यांमध्ये जमा होणाऱ्या पैशांवर सेक्‍शन 80C अंतर्गत कोणताही कर लागत नाही.

व्याज किती मिळते?

सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.6 टक्के इतके व्याज मिळते. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा फेरआढावा घेते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक व्याजदर मिळणाऱ्या योजनांमध्ये SSY चा समावेश आहे.

पंजाब नॅशनल बँकेने देऊ केलेल्या सुविधेनुसार, तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत SSYखाते उघडू शकतो. टपाल कार्यालय आणि व्यावसायिक बँकांमध्येही तुम्हाला SSY खाते उघडता येऊ शकते. एखाद्या गरीब कुटुंबातील मातापित्यांनी दरदिवशी मुलीच्या नावावर 100 रुपये जमा केले तरी वर्षाला 36000 रुपये खात्यात जमा होतात. सध्याचा 7.4 टक्क्यांच्या व्याजाने 14 वर्षांनी हा आकडा 15,22,221 रुपये इतका असेल.

कसे अॅक्टिव्ह कराल सुकन्या समृद्धी खाते?

पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्याचे खाते निष्क्रिय झाले तर ग्राहकास त्याच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागेल. यानंतर आपल्याला पुन्हा खाते सुरू करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. तसेच जेवढी वर्षे किमान पेमेंट थकले असेल ते भरावे लागेल. समजा तुमचे खाते दोन वर्षांपासून चालू नसेल तर तुम्हाला दोन वर्षाचे मिनिमम पेमेंट 500 रुपये आणि 100 रुपये दंड भरावे लागेल. एकूण 600 रुपये द्यावे लागतील. असे केल्यावर आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल.

इतर बातम्या :

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

PF Account : ‘या’ कारणामुळे तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी असणं गरजेचं, काय आहेत फायदे?

PF अकाऊंट ट्रान्सफर करताता ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा अर्धेच पैसे येतील

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.