अवघ्या 50 हजारात सुरु करा हा व्यवसाय, सरकार 35 टक्के भांडवल देणार, महिन्याला कमवाल एक लाख रुपये

Bee keeping | कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी बिझनेस लोनवर 25 टक्के अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींना या व्यवसायासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे भांडवल उभारण्याचा भार हलका होतो.

अवघ्या 50 हजारात सुरु करा हा व्यवसाय, सरकार 35 टक्के भांडवल देणार, महिन्याला कमवाल एक लाख रुपये
पोल्ट्री
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 10:28 AM

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर शेतीपुरक उद्योगांमधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या क्षेत्रात शेतीच्या तुलनेत अधिक कमाईची हमी असते. ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून हमखास केला जाणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनाचा व्यवसाय तुलनेत कमी जोखमीचा असून यामधून तुम्ही बक्कळ पैसेही कमावू शकता. (Earn good income by doing poultry business)

पाच ते नऊ लाख रुपयांच्या भांडवलात तुम्हाला हा व्यवसाय सुरु करता येईल. अगदी लहान स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरु केला तरी तुम्ही महिन्याला लाखभराच्या आसपास उत्पन्न मिळवू शकता.

किती खर्च येतो?

कुक्कुटपालनासाठी तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता असते. त्यानंतर कोंबडीची पिल्लं विकत घेण्यासाठी साधारण पाच ते सहा लाखांचा खर्च येतो. 1500 कोंबड्यांचे लक्ष ठेवले तर तुम्हाला 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कोंबड्यांच्या विक्रीसोबतच तुम्ही अंडी विकूनही पैसे कमावू शकता.

दरवर्षी 30 लाखापर्यंत कमाई

सलग 20 आठवडे कोंबड्यांच्या देखभालीचा खर्च एक ते दीड लाख रुपये इतका होतो. कोंबड्यांची एक बॅच वर्षभरात साधारण 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी द्यायला सुरवात करतात. तुमच्याकडे 1500 कोंबड्या असतील तर 290 अंड्यांच्या हिशेबाने वर्षाला 4, 35,000 अंडी मिळतील. यापैकी चार लाख अंडी विकली तरी तुम्ही चांगली कमाई करू शकता.

सरकारकडून 35 टक्के अनुदान

कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी बिझनेस लोनवर 25 टक्के अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींना या व्यवसायासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे भांडवल उभारण्याचा भार हलका होतो.

मधमाशा पाळा अन् महिन्याला पाच लाख कमवा

शेतीला पूरक असणाऱ्या अशाच उद्योगांपैकी एक म्हणजे मधुमक्षिका पालन (Beekeeping Business). हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी पाच लाखांपर्यंतही उत्पन्न कमावू शकता.

ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन हा अत्यंत फायद्याचा उद्योग ठरतो. शेतामधील जागेतच तुम्ही मधुमक्षिका पालनासाठीच्या पेट्या ठेवू शकता. मधमाशांमुळे पिकांचे परागीकरण चांगले होऊन शेतीचे उत्पादनही वाढण्याची शक्यता असते. मधुमक्षिका पालनासाठी तुम्हाला सरकारकडून अगदी 85 टक्क्यापर्यंत अनुदानही मिळू शकते.

तुम्ही किमान 10 पेट्या घेऊन मधुमक्षिका पालनाला सुरुवात करू शकता. जर प्रत्येक बॉक्समधून 40 किलो मध मिळाले तर 10 बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रतिकिलो 350 रुपये दराने 400 किलो मध विक्री केल्यास 1 लाख 40 हजार रुपये कमाई होते. प्रत्येक बॉक्सचा खर्च 3500 हजार रुपये येतो. याप्रमाणे 10 बॉक्सचा एकूण खर्च 35 हजार रुपये होतो. म्हणजे यातून तुम्हाला 1,05,000 रुपये फायदा होतो. मधमाशांच्या संख्येत वाढ होईल तसा हा व्यवसाय तीन पटीने वाढतो. वातावरण आणि इतर घटक पोषक असतील तर तुम्ही वर्षभरात 25 ते 30 पेट्यांच्या माध्यमातून मधाचे उत्पादन घेऊ शकता.

संबंधित बातम्या:

शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई

सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

(Earn good income by doing poultry business)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.