AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा पेन्शनचे पैसे अडकणार

Pension | डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम आजपासून लागू होतील. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते देशाच्या सर्व मुख्य कार्यालयांच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत 'हे' काम आटपा, अन्यथा पेन्शनचे पैसे अडकणार
पेन्शन
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 10:24 AM
Share

मुंबई: दरवर्षी बँकेत जाऊन आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करणे, हा पेन्शनधारकांसाठी नेहमीचा शिरस्ता मानला जातो. मात्र, त्यासाठी पेन्शनधारकांना बँकेत अनेक खेटे मारावे लागतात. एवढे करूनही हे काम यशस्वी होईल, याचीही खात्री नसते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्या हयातीचा दाखला बँकेत सादर करावा लागतो.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम आजपासून लागू होतील. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते देशाच्या सर्व मुख्य कार्यालयांच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भारताबाहेर असणाऱ्या पेन्शनधारकांनी काय करावे?

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, एक निवृत्तीवेतनधारक किंवा कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक जो भारतात रहिवासी नाही तो त्याच्या/तिच्या दुहेरी अधिकृत एजंटला मॅजिस्ट्रेट, नोटरी, बँकर किंवा भारताच्या राजनयिक प्रतिनिधीने स्वाक्षरी केलेले जीवन प्रमाणपत्र तयार करण्यास सांगू शकतो. या प्रकरणात, त्यांना वैयक्तिकरित्या प्रमाणपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही.

घरबसल्या जमा करा हयातीचा दाखला

नाममात्र शुल्क भरल्यानंतर आता पेन्शनधारक ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवेसाठी विनंती करु शकतात. यानंतर जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

नुकतीच ईपीएफओने पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2021पर्यंत वाढवली होती. याचा फायदा ईपीएफओमध्ये उपस्थित असलेल्या साडेतीन लाख पेन्शनधारकांना होईल, असे दावा त्यांनी केला होता. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वृद्ध लोकांना कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन, ईपीएफओने हा निर्णय घेतला होता.

हयातीचा दाखला सादर करणे का महत्त्वाचे?

प्रत्येक पेन्शनधारकाला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एका पेन्शन खाते असलेल्या बँकेत जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हयातीचा दाखला पेन्शनधारकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तो वेळेवर जमा न केल्यास पेन्शन थांबवले जाते.

आपल्या जवळच्या टपाल कार्यालयातून दाखला मिळवा

इंडिया पोस्टच्या घोषणेनंतर पेन्शनभोगी पेन्शन वितरण एजन्सीऐवजी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्याने सेवा बजावली आहे, त्या प्राधिकरणाकडे जाऊ शकते. भविष्यात पेन्शन मिळविणे सुरू ठेवण्यासाठी त्याचा हयातीचा दाखला मिळवू शकेल. ज्या निवृत्तीवेतनधारकांना पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीकडे जाण्यास अडचण येते, ते डिजिटल हयातीचा दाखला घेण्यासाठी जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्राला भेट देऊ शकतात.

संबंधित बातम्या:

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

Pension Alert | पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा फायदा!

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी ‘इथे’ करा तक्रार

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.