AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा; खाद्य तेलांच्या किंमती नियंत्रणात करण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा केली आहे. या मिशनचा प्रमुख उद्देश देशात पाम तेलाचं उत्पादनाचा चालना देणं हा आहे. या मिशनसाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा; खाद्य तेलांच्या किंमती नियंत्रणात करण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल
पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय खाद्यतेल मिशन
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 5:05 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या किंमती (Edible Oil Price) मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याचं बजेट कोलमडलं आहे. वाढत्या खाद्यतेलांच्या किंमतींवरून सरकारला टीकेचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Govt) मोठं पाऊल उचललं आहे. देशात राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची (National Edible Oil Mission) घोषणा करण्यात आली आहे. (The central government has taken a big step to control edible oil prices by announcing a national edible oil mission)

काय आहे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा केली आहे. या मिशनचा प्रमुख उद्देश देशात पाम तेलाचं (Palm Oil) उत्पादनाचा चालना देणं हा आहे. या मिशनसाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे. भारतात तेलबियांचं उत्पादन कमी आहे. या प्रकारच्या पिकांना चालना देणं, उत्पादन वाढवणं आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा या मिशनचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाला अशी योजन बनण्यासाठी सांगितलं होतं ज्यामुळे येत्या काही वर्षात खाद्य तेलांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होऊ शकेल आणि खाद्यतेलांची आयात करण्याची गरज पडणार नाही, त्यानंतर राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची आखणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, देशात पामतेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. चांगल्या दर्जाची बियाणं, टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दिली जाईल. ईशान्येकडील राज्यांमध्ये पामतेलाची शेती सुरू करण्यात आली आहे. याआधीही दाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत.

मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं पाम तेल

भारतात पामतेल (Palm Oil) आणि सोयाबिन तेल (Soybean Oil) सर्वात जास्त आयात केलं जातं. आयात केल्या जाणाऱ्या तेलामध्ये पाम तेलाचं प्रमाण 40 तर सोयाबिन तेलाचं प्रमाण 33 टक्के आहे. पाम तेल उत्पादनात इंडोनेशिया (Indonesia) जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर त्याखालोखाल मलेशियाचा (Malesia) नंबर लागतो. काही आफ्रिकन देशांमध्येही पाम तेलाचं उत्पादन घेतलं जातं. भारत या देशांकडून पाम तेलाची आयात करतं. यासोबतच, सर्वाधिक सोयाबिन तेल हे अर्जेंटिना (Argentina) आणि ब्राझिलमधून (Brazil) आयात केलं जातं. भारत वर्षाला 90 लाख टन पाम तेल आयात करतं. सूर्यफूलाचं तेल (Sunflower Oil) सर्वाधिक युक्रेनमधून आयात केलं जातं. त्यामुळे देशांतर्गत पाम तेल उत्पादनाला चालना देण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत.

भारतात रिफाईंड खाद्यतेलाची मागणी वाढली

मागच्या 20 वर्षांत देशात जेवणात रिफाईंड तेलांचा (Refined Oil) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारताची लोकसंख्या दरवर्षी सरासरी अडीच कोटींनी वाढते. या हिशोबाने खाद्य तेलची मागणी दरवर्षी 3 ते 3.5 टक्के वाढत असल्याचा अंदाज आहे. सध्या भारत एका वर्षात 60 ते 70 हजार कोटी रुपये खर्च करून 1.5 कोटी टन खाद्य तेल खरेदी करतं. देशाच्या लोकसंख्येनुसार भारताला दरवर्षी साधारण अडीच कोटी टन खाद्यतेलाची गरज आहे. (The central government has taken a big step to control edible oil prices by announcing a national edible oil mission)

काय आहे पाम तेल?

पाम तेल एकप्रकारचं वनस्पती तेल आहे. ताडाच्या झाडाच्या बियांपासून पाम तेल काढलं जातं. या तेलाला कसल्याही प्रकारचा वास नसतो. त्यामुळे स्वयंपाकात हे तेल वापरलं जातं. जगभरात याचा वापर केला जातो. परदेशातून आयात केलेल्या पाम तेलाचा उपयोग देशातल्या अनेक उद्योगांमध्ये केला जातो. याशिवाय देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या इतर तेलांमध्येही पाम तेल मिसळलं जातं.

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाद्यतेलांमध्ये पाम तेल मोठ्या प्रमणात वापरलं जातं. याशिवाय अनेक उद्योगांमध्येही पाम तेलाचा वापर होतो. अंगासाठी वापरात येणाऱ्या साबणांच्या निर्मितीमध्येही पाम तेलाचा वापर होतो. पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे चॉकलेट-टॉफी बनवण्यातही पामतेलाचा वापर केला जातो. सध्या जगभरात जवळपास 8 कोटी टन पाम तेलाची निर्मिती केली जाते.

संबंधित बातम्या :

‘या’ राज्यात इंधनटंचाई; दुचाकीस्वारांना 5 लीटर, कारसाठी फक्त 10 लीटर पेट्रोल मिळणार

Ujjwala 2.0: मोफत गॅस कनेक्शन योजना पुन्हा सुरु होणार, पंतप्रधान मोदींकडून होणार उद्घाटन

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दिवसाला 2 रुपये गुंतवा आणि म्हातारपणी मिळवा 36 हजारांची पेन्शन

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.