एसबीआयने ग्राहकांना दिली ही सुविधा; घरबसल्या एका क्लिकवर डाऊनलोड करा एफडी व्याज प्रमाणपत्र

बँकेने ग्राहकांना उद्देशून ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘एसबीआय ऑनलाईनवर लॉग इन करा आणि आपले जमा व्याज प्रमाणपत्र मिळवा. यासाठी 4 सोप्या स्टेप्सचे पालन करा. याद्वारे प्रमाणपत्र मिळवण्याचे तुमचे काम होईल. आता https://onlinesbi.com या लिंकवर क्लिक करा.

एसबीआयने ग्राहकांना दिली ही सुविधा; घरबसल्या एका क्लिकवर डाऊनलोड करा एफडी व्याज प्रमाणपत्र
एसबीआयने ग्राहकांना दिली ही सुविधा; घरबसल्या एका क्लिकवर डाऊनलोड करा एफडी व्याज प्रमाणपत्र
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 8:04 AM

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकार नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचा सल्ला दिला गेला आहे. याच अनुषंगाने अनेक बँकाही आपल्या ग्राहकांना बऱ्याच सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देत आहेत. खाजगी बँकांबरोबरच सरकारी बँकांनीही यात आघाडी मिळवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देऊ केल्या आहेत. त्यात आता आणखी एका सुविधेची भर पडली आहे. ज्याद्वारे ते सहजपणे घरी बसून त्यांचे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) व्याज प्रमाणपत्र ऑनलाइन मिळवू शकतात. यासाठी त्यांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. तसेच एसबीआय नेटबँकिंग सेवेद्वारे त्यांचे एफडी व्याज प्रमाणपत्र मिळू शकेल. एसबीआयने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. (This facility provided by SBI to the customers; Download FD interest certificate at home with one click)

बँकेने ग्राहकांना उद्देशून ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘एसबीआय ऑनलाईनवर लॉग इन करा आणि आपले जमा व्याज प्रमाणपत्र मिळवा. यासाठी 4 सोप्या स्टेप्सचे पालन करा. याद्वारे प्रमाणपत्र मिळवण्याचे तुमचे काम होईल. आता https://onlinesbi.com या लिंकवर क्लिक करा.

एफडी व्याज प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे?

– एसबीआयच्या onlinesbi.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. – त्यानंतर पर्सनल बँकिंगच्या ई-सर्व्हिस टॅबवर जा. – येथे ‘माय सर्टिफिकेट’ टॅबवर क्लिक करा. – आता जमा खात्याच्या व्याज प्रमाणपत्रावर क्लिक करा. या प्रक्रियेचे पालन करून तुम्ही तुमच्या एफडीवर मिळविलेल्या व्याजाचा तपशील सहज पाहू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.

जाणून घ्या एसबीआयमध्ये एफडीवर किती व्याज मिळते

एसबीआय आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी देते. दरवर्षी व्याज दर बदलतात. गुंतवणूकदार जितके जास्त पैसे गुंतवतील, तितके जास्त नफा मिळवतात. 7 दिवस ते 45 दिवसांसाठी आता एसबीआय 2.90 टक्के दराने व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 3.40 टक्क्यांच्या दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर 1 वर्षापासून 2 वर्षासाठी 5 टक्के व्याज तसेच 5 वर्षे ते 10 वर्षांसाठी 5.40 टक्के व्याज देत आहे. सरकारी बँकांना सध्याच्या घडीला विविध खाजगी बँकासोबत स्पर्धा करावी लागत आहे. या स्पर्धेत आपण ग्राहकोपयोगी सेवा देण्यात कुठेही कमी पडू नये, याची खबरदारी सरकारी बँका घेत असल्याचे दिसून येत आहे. (This facility provided by SBI to the customers; Download FD interest certificate at home with one click)

इतर बातम्या

IND vs SL : श्रीलंकेने लाज राखली, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय

VIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.