AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crorepati Tips : तुम्ही पण करता का ही चूक, मग कसं होणार करोडपती

Crorepati Tips : करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येक जण बचत करतात. गुंतवणूक करतात. पण ही चूक महागात पडते आणि अनेकांचे स्वप्न भंगते. कोणती आहे ही चूक, तुम्ही तर करत नाही ना?

Crorepati Tips : तुम्ही पण करता का ही चूक, मग कसं होणार करोडपती
| Updated on: Jun 17, 2023 | 4:10 PM
Share

नवी दिल्ली : करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न काही जणच पूर्ण करु शकता. इतर जणांना ही चूक भोवते. अनेक गुंतवणूकदार ही चूक करतात. तुम्ही जो पैसा कमवता, तो घरात साठवून ठेवण्यापेक्षा गुंतवलेला कधीही फायदेशीर असतो, असे अनेक तज्ज्ञ आपल्याला सांगतात. गुंतवणूक केलेला पैसा काही वर्षांनी वाढतो आणि भविष्यात तो उपयोगी पडतो. त्यामुळे तुम्हाला करोडपती (Crorepati Tips) व्हायचे असेल तर तरुण वयातच गुंतवणूक (Investment) करणे फायदेशीर ठरते. करोडपती होण्यासाठी प्रत्येक जण बचत करतात. गुंतवणूक करतात. पण ही चूक महागात पडते आणि अनेकांचे स्वप्न भंगते. कोणती आहे ही चूक, तुम्ही तर करत नाही ना?

हा वापरा फॉर्म्युला महागाईमुळे बचत करता येत नसल्याची ओरड प्रत्येक जण करतो. पण अगदी कमी पगारातही थोडीफार बचत, गुंतवणूक होऊच शकते. पण त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्चाला कात्री लावावी लागेल. त्यासाठी कमाईचा हिशेब ठेवावा लागेल. बचतीसाठी तुम्ही 50:30:20 हा फॉर्म्युला वापरु शकता. या फॉर्म्युलानुसार, तुम्ही 50 टक्के रक्कम आवश्यक खर्चासाठी राखीव ठेवा. तर 30 टक्के रक्कम अचानक येऊ शकणाऱ्या खर्चासाठी वापरा. 20 टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी वापरा.

असा लावा हिशोब 20,000 रुपये पगार असेल तर त्यातील 20 टक्के म्हणजे 4,000 रुपयांपर्यंत महिना गुंतवणूक करावी लागेल. 16,000 रुपये घर खर्चासाठी वापरु शकता. पण गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दर महिन्याला ही गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

असे करा पूर्ण स्वप्न सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर आहे. अशा अनेक योजना आहे की ज्या कंपाऊंडिंग इंटरेस्‍टचा फायदा देतात. ही गुंतवणूक अनेक पटीत वाढते. पण गुंतवणूकदार म्युच्युअल फंडावर लट्टू आहेत. म्युच्युअल फंडात तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करु शकता. ही शेअर बाजाराशी संबंधीत योजना आहे.

असे व्हा करोडपती तर गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे 6,000 रुपये हाती असतील. तुम्ही योग्य म्युच्युअल फंड निवडला आणि त्यात गुंतवणूक केली तर भविष्यात मोठा फायदा होईल. म्युच्युअल फंडमध्ये 6000 रुपयांची SIP गुंतवणूक केल्यास फायदा होईल. पगार वाढला तर त्यातील काही हिस्सा पुन्हा एसआयपीद्वारे गुंतविता येईल. दरवर्षी एसआयपीत तुम्ही 20 टक्के वाढ केली. 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली, तर फायदा दिसेल. 12 टक्के हिशोबाने तुम्हाला एकूण 2,17,45,302 रुपये मिळतील. तर व्याजाच्या रुपाने 15 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 3,42,68,292 रुपये होईल. म्हणजे 20 वर्षांनंतर तुम्ही करोडपती होऊ शकता.

विशेष सूचना : याठिकाणी केलेली आकडेमोड ही केवळ अंदाजे केलेली आहे. योग्य परिणाम आणि अधिक परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.