AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत तुमच्या बर्थवर कोणी बसू शकत नाही, TTE रात्री तिकीट चेक करु शकत नाही… रेल्वेचे हे नियम तुमच्यासाठी फायदेशीर

indian railway important rule for passengers: रात्री दहा वाजेनंतर कोणताही सहप्रवाशी मोबाईलवर किंवा इतर गॅजेटवर आवाज करणारे गाणे लावू शकत नाही. त्याला रात्री दहानंतर मोबाईलवर गाणे, चित्रपट पाहायचे असेल तर त्याला एअरफोनचा वापर करणे सक्तीचे असले. या नियमाप्रमाणे कोणी वागले नाही तर त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्याकडे करता येते.

रेल्वेत तुमच्या बर्थवर कोणी बसू शकत नाही, TTE रात्री तिकीट चेक करु शकत नाही... रेल्वेचे हे नियम तुमच्यासाठी फायदेशीर
Indian Railway
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 05, 2024 | 7:06 AM
Share

भारतीय रेल्वेने मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. रेल्वेतून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सर्वात चांगला पर्याय रेल्वे आहे. त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करुन आरामदायक प्रवास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करतात. परंतु रेल्वेने प्रवास करताना अनेक महत्वाच्या नियमांची माहिती नसते. यामुळे सहप्रवाशी असलेल्या लोकांशी भांडण होते. रेल्वेने प्रवास करताना हे नियम माहिती असल्यास तुमचा प्रवास अधिक चांगला होणार आहे.

काय आहे नियम

रेल्वेत तुम्हाला मिडल बर्थ मिळाल्यास अडचण होते. लोअर बर्थ असणारा व्यक्ती खालचा सीटवर झोपून राहतो. मग मिडल बर्थ असणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा मिळत नाही. परंतु रेल्वे नियमानुसार सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लोअर बर्थ बसण्यासाठी असतो. या वेळेत लोअर, मिडल आणि अप्पर बर्थ असणारे तिघे जण बसून प्रवास करु शकतात. मिडल बर्थ वाल्या व्यक्तीस गरज वाटली आणि लोअर बर्थच्या व्यक्तीने समंती दिली तर मधला बर्थ लावून दोघे प्रवाशी झोपून प्रवास करु शकतात.

टीटीई रात्री चेक करु शकत नाही

अनेकवेळा टीटीई रात्री तिकीट तपासणीसाठी येतो. परंतु रेल्वे नियमानुसार रात्री दहा वाजेनंतर झोपलेल्या प्रवाशाला उठवून टीटीई तिकीट चेक करु शकत नाही. रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत धावत्या ट्रेनमध्ये टीटीईला तिकीट चेक करता येत नाही. त्याला सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तिकीट चेक करता येते.

रात्री गाणे लावू शकत नाही

रात्री दहा वाजेनंतर कोणताही सहप्रवाशी मोबाईलवर किंवा इतर गॅजेटवर आवाज करणारे गाणे लावू शकत नाही. त्याला रात्री दहानंतर मोबाईलवर गाणे, चित्रपट पाहायचे असेल तर त्याला एअरफोनचा वापर करणे सक्तीचे असले. या नियमाप्रमाणे कोणी वागले नाही तर त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्याकडे करता येते. त्यानंतर रेल्वे कर्मचारी त्या व्यक्तीला समज देईल. त्यानंतरही त्याने ऐकले नाही तर त्याच्यावर कारवाई होते.  रेल्वेने प्रवास करताना या सर्व नियामांची माहिती प्रवाशांना गरजेची आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...