AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीओचं अर्थचक्र : ‘या’ कंपन्याची लवकरच एन्ट्री, सेबीकडे कागदपत्रे सादर

फूटवेअर कंपनीने सादर केलेल्या ड्राफ्टमध्ये गुंतवणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे. हरी कृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल आणि टीपीजी ग्रोथ III SF प्रायव्हेट लिमिटेड आणि QRG एंटरप्रायजेस लिमिटेड द्वारा शेअर्स आणण्यात येतील.

आयपीओचं अर्थचक्र : 'या' कंपन्याची लवकरच एन्ट्री, सेबीकडे कागदपत्रे सादर
IPO - आयपीओ
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 8:15 PM
Share

नवी दिल्ली : बाजारात आयपीओ आणण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. कॅपिलरी टेक्नॉलॉजी इंडियाने सेबीकडे इनिशियल पब्लिक आॕफरिंग (IPO) साठी प्रारंभिक कागदपत्रे सादर केली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित क्लाउड नेटिव्ह सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आणि सोल्यूशन कंपनी आहे. कंपनीने आपल्या धोरणांनुसार आयपीओच्या माध्यमातून 850 कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फ्रेश इश्यूचे 200 कोटींचे आणि ऑफर फॉर सेलचे 650 कोटी यामध्ये समाविष्ट आहेत.

CTIPL कंपनीत 98.06 टक्के शेअरहोल्डिंग आहेत. सेबीकडे केलेल्या फायलिंग नुसार, प्री-आयपीओ प्लेसमेंट पूर्ण झाल्यानंतर फ्रेश इश्यूच्या साईझमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंट प्रमाणे कपात केली जाईल.

आयपीओतला पैसा कुठे वापरणार?

फ्रेश इश्यू द्वारे प्राप्त रकमेचे थकित रकमेची देयता, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी अपग्रेड यासोबतच धोरणात्मक गुंतवणूक आणि कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जाईल.

कॕपिलरीला वित्तीय वर्ष 2021 मध्ये 114.9 कोटी रुपयांच्या महसूलावर 16.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता. यासोबतच जून 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी 33.16 कोटी रुपयांच्या महसूलावर 2.53 कोटींचा नफा प्राप्त झाला. कंपनीच्या दाव्यानुसार आशिया-पॕसिफिक क्षेत्रात 39 टक्के बाजाराच्या हिस्सेदारीसह बाजारात अग्रक्रमावर आहे. ICICI सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॕपिटल कंपनी आणि नोमूरा फायनान्शियल अॕडव्हायजरी अँड सिक्युरिटीजला (इंडिया) इश्यूच्या बुक रनिंग लीड मॕनेजर्सच्या स्वरुपात नियुक्त करण्यात आले आहे.

फूटवेअर कंपनीचा आयपीओ

फूटवेअर कंपनी कँपस अॕक्टिव्ह वेअरने बाजार नियमक सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली आहेत.प्रमोटर्स आणि वर्तमान शेअरधारकांद्वारे 5.1 कोटी इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे.

फूटवेअर कंपनीने सादर केलेल्या ड्राफ्टमध्ये गुंतवणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे. हरी कृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल आणि टीपीजी ग्रोथ III SF प्रायव्हेट लिमिटेड आणि QRG एंटरप्रायजेस लिमिटेड द्वारा शेअर्स आणण्यात येतील.

गुंतवणुकदारांचा ‘सर्वोच्च’ प्रतिसाद!

एका अहवालानुसार, वर्ष 2021 मध्ये 59 कंपनीच्या आयपीओ पैकी 36 कंपन्यांना दहा पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी 6 कंपन्यांच्या आयपीओला 100 पटी पर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले. 8 आयपीओला तीन पट आणि उर्वरित 15 कंपन्यांच्या आयपीओला तीन पटीपर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती दिली आहे. एकूण इश्यू मध्ये रिटेलचा हिस्सा 10 पटीहून अधिक आहे.

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. कंपनीद्वारे मार्केटमध्ये पैसे गोळा करण्याचा अथवा उभारण्याचा आयपीओ महत्वाचा मार्ग आहे.

इतर बातम्या

लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता; तर लक्षात ठेवा ‘या’ चार गोष्टी

(Two companies will bring initial public offering in marketplace)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.