AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधारकार्ड अपडेट करायचं राहिलं! टेन्शन घेऊ नका; UIDAI ने घेतला मोठा निर्णय

आधारकार्ड हे अनिवार्य दस्ताऐवज आहे. पण अनेकदा आधारकार्ड अपडेट करणं राहून जातं. आधार डीटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची डेडलाईन 14 डिसेंबर देण्यात आली होती. पण तुम्हीही अपडेट करायला विसरलात का? तर टेन्शन घेऊ नका. कारण...

आधारकार्ड अपडेट करायचं राहिलं! टेन्शन घेऊ नका; UIDAI ने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Dec 16, 2024 | 5:45 PM
Share

आधारकार्डशिवाय आता भारतात राहणं कठीण आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आधारकार्ड हे आता महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. प्रत्येक सरकारी कामात या कागदपत्राची आवश्यकता भासते. त्यामुळे याकडे कानाडोळा करून चालणार नाही. आधारकार्ड प्रत्येक भारतीयांचं ओळखपत्र आहे. युआयडीएआयने आधार डीटेल फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती. पण ही डेडलाईन उलटून गेल्याने अनेकांच्या पोटी गोळा आला होता. तुम्हीही आधारकार्डमध्ये डीटेल अपडेट करण्यास विसरला असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण युआयडीएआयने आधार डीटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची डेडलाईन वाढवली आहे. आता हे डेडलाईन 14 जून 2025 पर्यंत असणार आहे. म्हणजेच तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी अजून सहा महिन्यांचा अवधी मिळाला आहे. या तारखेनंतर आधार डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त फी भरावी लागणार आहे. त्यामुळे आधार डिटेल अपडेट करायचे असतील तर सहा महिन्यांच्या आत करा. ही फ्री सेवा myAadhaar पोर्टलवर आहे.

युआयडीएआयने एक्स खात्यावर याबाबत एक पोस्ट केली असून त्याबाबत माहिती दिली आहे. ‘UIDAI ने मोफत ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. जेणेकरून लाखो आधार क्रमांक धारकांना फायदा होऊ शकेल. ही मोफत सेवा myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. UIDAI लोकांना त्यांचे आधार डॉक्युमेंट अपडेट ठेवण्यासाठी सतत प्रेरित करत आहे.’

आधार कार्डमध्ये नेमकं काय अपडेट करायचं हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तरही तुम्हाला इथे मिळेल. ज्या लोकांनी आधारकार्ड काढून 10 वर्षांचा कालावधी लोटला आणि त्यात काही गोष्टी अपडेट केल्या नाहीत. जसं की घरचा पत्ता वगैरे बदलला असेल. त्यांना अपडेट करण्याची संधी आहे. पण अपडेट करणं हे काही अनिवार्ड नाही. एका व्यक्तीला एक आधार क्रमांक मिळतो आणि त्यात त्याचे वैयक्तिक बायोमेट्रिक्स असतात.

आधार अपडेट प्रक्रिया

  • सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.
  • आता आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरा आणि नंतर OTP येईल तो टाका.
  • आवश्यक कागदपत्रावर क्लिक करा आणि ते अपलोड करा.
  • अपडेट रिक्वेस्ट फॉर्म भरा.
  • तुमची रिक्वेस्ट सेंड करा. तुम्हाला आधार ट्रॅक करण्यासाठी URN मिळेल. ते सेव्ह करा.
  • बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. फिंगरप्रिंट स्कॅन, फोटो किंवा आयरिस बदलण्यासाठीही शुल्क भरावे लागेल.

Follow Us
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.