नवीन GPS! दुकान, बाजार, रुग्णालयाबद्दलची सर्व माहिती, UMANG अ‍ॅपचे भन्नाट फीचर्स

‘डिजीटल इंडिया’ कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी तसेच ‘आत्मनिभार भारत’ हा विषय लक्षात घेऊन MeitY ने मॅप माय इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे.

नवीन GPS! दुकान, बाजार, रुग्णालयाबद्दलची सर्व माहिती, UMANG अ‍ॅपचे भन्नाट फीचर्स
umang-app

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (MeitY) सरकारी सेवा ऑनलाईन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. सर्व नागरिकांचे जीवन सुकर व्हावे यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. ‘डिजीटल इंडिया’ कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी तसेच ‘आत्मनिभार भारत’ हा विषय लक्षात घेऊन MeitY ने मॅप माय इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे आता उमंग अ‍ॅपमध्ये नकाशाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

उमंग अ‍ॅप्लिकेशन आणि मॅप माय इंडियाच्या करारामुळे आता नागरिकांना एका क्लिकवर सर्व गोष्टी सहज मिळणार आहेत. यात तुम्हाला एखादी सरकारी सुविधा, बाजारपेठ, रक्तपेढी आणि इतर सर्व ठिकाणची माहिती मिळणार आहे. तसेच मॅप माय इंडियामुळे तुम्हाला भारतातील एखाद्या हायवेपासून अगदी खेड्यापाड्यातील रस्तेही सहज सापडतील.

‘या’ नवीन सुविधा मिळणार

उमंग ऍपने यापूर्वीच मॅप माय इंडियाच्या माध्यमातून पुढील बाबतींत नकाशा सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे.

💠मेरा राशन/ रेशन – मॅप माय इंडियाच्या नकाशावर स्वस्त धान्य दुकाने पॉईंटर स्वरूपात दाखवण्यात आली आहेत. उमंगच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते.

💠ई- नाम – उमंगच्या माध्यमातून वापरकर्त्याना ‘माझ्याजवळची मंडई / मंडी/ घाऊक बाजारपेठ’ ही सुविधा मिळत आहे.  त्यानुसार तुम्ही नकाशावरील पॉईंटरच्या मदतीने दिशा समजून घेऊ शकता. त्यामुळे तिचे ठिकाण नेमके कुठे आहे, याची माहिती तुम्हाला सहज प्राप्त होईल.

💠दामिनी- ‘विजांच्या कडकडाटासह इतर धोक्याची पूर्वसूचना’ याद्वारे दिली जाणार आहे. तसेच तुमच्या आजूबाजूच्या भागात कुठे वीज कोसळली असेल तर त्याचीही माहितीही तुम्हाला मिळेल.

दरम्यान नागरिकांसाठी हे अ‍ॅप अधिक उपयुक्त ठरावे यासाठी ही पुढील आणखी काही सेवांसाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

💠ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळ- वापरकर्त्यांना ईएसआयसीची रुग्णालये/ दवाखाने वगैरे केंद्रे नकाशावर दिसून दिशा समजणे शक्य होईल.

💠इंडियन ऑइल- जवळचे गॅसस्टेशन तसेच इंधन भरणा स्थानकासह किरकोळ स्थानक तसेच वितरकांची माहिती तुम्हाला यात समजणे शक्य होईल.

💠एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण– प्रवासादरम्यान पथकर नाके आणि पथकराचे दर समजण्यासाठी मदत होईल.

💠एनसीआरबी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था- जवळपास असणाऱ्या पोलीस ठाण्याची माहिती आणि ठिकाण नकाशावर मिळू शकेल.

💠प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (मेरी सडक)- या योजनेतील खराब रस्त्यांविषयीच्या तक्रारी नोंदवायचा असल्यास, मॅपमायइंडियाच्या मंचावरून तो विशिष्ट रस्ता निवडून तक्रार करणे शक्य होईल.

(UMANG app update to help find blood banks, fuel pumps lightning alerts using MapmyIndia maps

संबंधित बातम्या : 

गूगल पिक्सेल फोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, फोनमध्ये आले नवीन बॅटरी बचत फिचर

महिन्याला केवळ 2 रुपये द्या आणि अमेझॉन प्राईमच्या या उत्कृष्ट सेवेचा फायदा घ्या; जाणून घ्या याबाद्दल सर्वकाही

या स्मार्ट फ्रिजसह आपले स्वयंपाकघर बनवा आधुनिक, सॅमसंगने लाँच केला थ्री डोअर रेफ्रिजरेटर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI