AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय ? ते नियमित एफडीपेक्षा कसे वेगळे आहे; जाणून घ्या

तुमच्या दोन्ही डिपोझिटचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तो तुम्हाला एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि वर्ष अशा आधारावरती तुम्हाला व्याजाचा फायदा मिळू शकतो.

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय ? ते नियमित एफडीपेक्षा कसे वेगळे आहे; जाणून घ्या
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 1:04 PM
Share

मुंबई – मुदत ठेवमध्ये अनेकांनी आत्तापर्यंत गुंतवणुक (Investment) केली आहे, कारण ही गुंतवणूक फार जुनी असून यामध्ये गुंतवणूक करणा-यांना चक्रवाढीचा फायदा नेहमी होतो. तो लाभ पहिल्या दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत मिळू शकतो. विशेष म्हणजे एखादा गुंतवणूकदार गुंतवणूक करताना वेगवेगळ्या कालावधीची एफडी (fixed deposit) मिळवू शकतो. मुदत ठेवीला मुदत ठेव देखील म्हणतात, कारण ती मुदतीनंतर परिपक्व होते. खासकरून मुदत ठेवा या बचत खात्यापेक्षा (savings account) जास्त परतावा देतात. एफडी कर तुम्हाला कायमस्वरूपी बचत देत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मुदत ठेवी देखील करमध्ये सवलती देतात. आता आप टॅक्स सेव्हिंग एफडीबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

तुमच्या ज्या मुदत ठेवीला जो वजावटीचा लाभ मिळतो त्याला टॅक्स सेव्हिंग एफडी म्हणतात. टॅक्स सेव्हिंग एफडीची वरची मर्यादा रु. 1.5 लाख आहे, तसेच नियमित एफडीसाठी कोणतीही मर्यादा नाही. वेगवेगळ्या बँकांसाठी कमी मर्यादा 100 ते 1000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणुकीला आयकर कलम 80 अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो. त्याची मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपये आहे.

तुमच्या टॅक्स सेव्हिंग एफडी आणि रेग्युलर एफडी या दोन्ही एफडीचे व्याजदर हे कमी अधिक प्रमाणात समान आहे. टॅक्स सेव्हिंग एफडी आणि रेग्युलर एफडीच्या सेव्हींग खात्यावर तुम्हाला जास्त व्यास मिळते.

गुंतवणुकदार ज्या ब्रॅकेटमध्ये त्याला त्या पध्दतीनुसार कर भरावा लागतो. तुमच्या सेव्हिंग खात्याचे व्याजाचं उत्पन्न करपात्र आहे. कलम 80TTA नुसार, एका आर्थिक वर्षात बचत खात्यावर 10 हजारांपर्यंतचे व्याज कर मुक्त आहे.

तुम्ही ठेवलेल्या फिक्स डिपॉझिटला सुध्दा टॅक्स लागतो, हा नियम टॅक्स एफडीला सुध्दा लागू होतो. तुमच्या एफडीतुन होणार तुमचं इन्कम तुमच्या टोटल रकमेत जमा केलं जातं. तसेच तुमच्या टॅक्स स्लैबनुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागतो.

टॅक्स सेव्हिंगचा काळ हा पाच वर्षाचा असतो. त्यामध्ये तुमची रक्कम 5 वर्षासाठी बंद केली जाते. त्याच्यापेक्षा हा काळ अधिक देखील असू शकतो. तुमच्या टॅक्स सेव्हिंगसाठी एफडीसाठी तुम्हाला कमीतकमी 1000 रक्कम तर अधिकतर 1.5 लाख रूपयापर्यंत असू शकते.

तुमच्या दोन्ही डिपोझिटचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तो तुम्हाला एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि वर्ष अशा आधारावरती तुम्हाला व्याजाचा फायदा मिळू शकतो. तुमचं वार्षिक व्याजाचं उत्पन्न जर 40 हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला त्यावर TDS भरावा लागेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.