AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 200 रुपयांत मिळवा 75,000 रुपयांचा लाईफ कव्हर, सरकारची योजना काय?

आपण अनेकदा पाहतो की कुटुंबांमध्ये एकटाच व्यक्ती कमावता असतो आणि संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून असतं. अशा कुटुंबांसाठी सरकारने ‘आम आदमी बीमा योजना’ ही एक अतिशय उपयुक्त योजना सुरू केली आहे. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती, तिचे फायदे आणि अर्ज करण्याची अचूक प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

फक्त 200 रुपयांत मिळवा 75,000 रुपयांचा लाईफ कव्हर, सरकारची योजना काय?
Life Cover insurance
| Edited By: | Updated on: Jul 07, 2025 | 4:14 PM
Share

कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा सर्वकाही एका क्षणात बदलून जातं. विशेषतः त्या कुटुंबांसाठी जे एका कमावत्या व्यक्तीवरच अवलंबून असतात. जर तो आधारच हरवला तर संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडतं. अशा वेळी जर आधीच आर्थिक सुरक्षेची सोय केली असेल, तर संकट थोडं तरी टळू शकतं.

अशाच गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक अतिशय उपयुक्त योजना म्हणजे “आम आदमी बीमा योजना”. ही योजना LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत राबवली जाते आणि मुख्यतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी तयार करण्यात आलेली आहे.

200 रुपयांत मिळतो 75,000 रुपयांचा कव्हर

या योजनेअंतर्गत फक्त 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये तुम्हाला 75,000 रुपयांपर्यंतचा लाईफ इन्शुरन्स मिळू शकतो. ही योजना विशेषतः अशा कुटुंबांसाठी आहे जे गरीबी रेषेखाली (BPL) जीवन जगत आहेत आणि ज्यामध्ये फक्त एकच कमावणारा सदस्य आहे.

या योजनेचे फायदे

1. अपघाती मृत्यू: 75,000 रुपये

2. पूर्ण अपंगत्व: 75,000 रुपये

3. आंशिक अपंगत्व: 37,500 रुपये

4. नैसर्गिक मृत्यू: 30,000 रुपये

5. शिष्यवृत्ती: दोन मुलांना (9वी ते 12वी) दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती

ही योजना एकप्रकारे गरीब कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरते. कमावणाऱ्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूनंतर किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास, कुटुंबावर आर्थिक भार येतो. अशा वेळी ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरते.

पात्रता काय आहे?

1. अर्जदाराचे वय 18 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे

2. कुटुंब गरीबी रेषेखालील (BPL) असावे

3. घरात फक्त एक कमावणारी व्यक्ती असावी

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाही. तुम्हाला स्थानिक नोडल एजन्सी (जसे की ग्राम पंचायत, नगरपालिका कार्यालय किंवा LIC एजंट) यांच्याकडे जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत तुमचं वय, उत्पन्न, ओळखपत्र, BPL प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रं जोडावी लागतील.

शेवटी का करावी ही योजना?

आजही देशात असंख्य कुटुंबं अशी आहेत ज्यांचं आयुष्य फक्त एका कमावणाऱ्या व्यक्तीच्या भरवशावर चालतं. जर त्या व्यक्तीला काही झालं, तर कुटुंबाचं संपूर्ण अर्थचक्र कोलमडतं. आम आदमी बीमा योजना अशा कुटुंबांसाठी एक मोफत सुरक्षा कवच आहे. फक्त 200 रुपयांत मिळणारा हा कव्हर तुमच्या कुटुंबासाठी संकटात आधारभूत ठरू शकतो.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.