AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Updated returns म्हणजे नक्की कायरे भाऊ? जाणून घ्या अपडेटेट रिटर्नचा कोणाला फायदा होतो

अपडेटेट रिटर्न भरण्याची सुविधा मिळाली याचा अर्थ तुम्हाला IT रिटर्न फाइल करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला असा होत नाही. ज्या व्यक्तींनी आपलं उत्पन्न लपवलं आहे त्यांनी दंडासहित सुधारित रिटर्न भरण्याची सुविधा मिळाली असा होतो. अपडेटेट रिटर्न म्हणजे नक्की काय ते समजाऊन घेऊयात.

Updated returns म्हणजे नक्की कायरे भाऊ? जाणून घ्या अपडेटेट रिटर्नचा कोणाला फायदा होतो
| Updated on: Mar 24, 2022 | 5:40 AM
Share

मुंबई : मुंबईमध्ये (mumbai) एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महेंद्रनं ऑगस्ट 2021 मध्ये फ्लॅटची विक्री केली. या व्यवहारातून 10 लाख रुपयांचा नफा मिळाला. मात्र, कर वाचवण्याच्या चक्करमध्ये त्यानं नफा आयकर रिटर्न (Income tax return) भरताना दाखवला नाही. अशाच एका प्रकरणात महेंद्र याच्या मित्राला आयकर विभागाची (Income tax department) नोटीस आल्यानंतर महेंद्रची चिंता वाढली. महेंद्र सारख्या लोकांसाठी अर्थसंकल्पात एक नवीन सुविधा देण्यात आलीये. आयकर रिटर्न भरताना अशा उत्पन्नाचा उल्लेख केलेला नसल्यास त्यांना दंड भरून सुधारित रिटर्न भरता येतो. या तरतुदीमुळे करदात्याला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते. मात्र, यासाठी फक्त दोन वर्षाच्या आतच रिटर्न भरावा लागणार आहे. यासाठी एक उदाहरण पाहूयात. सध्या महेंद्र 31 मार्च, 2022 पर्यंत 5000 रुपयांच्या दंडासहित सुधारित आयकर रिटर्न भरू शकतो. त्यानंतर मात्र दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध राहणार नाही. नवीन व्यवस्थेत दोन वर्षापर्यंत दंडासहित रिटर्न सुविधा आहे.

लाभ कोणाला घेता येतो?

अर्थ विधेयकानुसार सुधारित आयटीआर एक वर्षांच्या आत भरल्यास एकूण कर आणि व्याजावर 25 टक्के दंड द्यावा लागतो. जर दोन वर्षापर्यंत रिटर्न भरल्यास ५० टक्के दंड भरण्याची तरतूद आहे. स्वेच्छेने उत्पन्न जाहीर केल्यास करप्राप्त रक्कमेवर प्रति महिना एक टक्के व्याजदरानं कर वसूल केला जातो. स्वत:हून उत्पन्न जाहीर करणाऱ्यांसाठी सरकारची ही एक चांगली योजना आहे. मात्र, ही योजना सरसकट सगळ्यांसाठी नाही. ज्या व्यक्तींना आयकर विभागाची नोटीस आली आहे किंवा आयकर विभागाकडे प्रकरण प्रलंबित आहे, त्यांना नवीन सुविधेचा वापर करता येणार नाही.आयकर विभागाचा निर्णय आल्यानंतरच सुविधेचा वापर करता येतो. तसेच एखाद्या व्यक्तीला रिफंड घ्यायचं असल्यास किंवा होमलोनसाठी आयटीआरची गरज असल्यास या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

कर संकलन वाढवण्यासाठी सरकारची योजना

नागरिकांनी स्वत:हून कर भरावा यासाठी सरकारनं ही योजना सुरू केलीय. टॅक्स रिटर्न भरताना एखादी चूक राहिली असल्यास चूक सुधारण्याची संधी सरकारनं उपलब्ध करून दिलीये. ज्या व्यक्तींकडे अघोषित उत्पन्न आहे त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. उत्पन्न आयटीआरमध्ये दाखवलं नसल्यास कर चोरीचं प्रकरण समजलं जातं. सध्या सर्वच व्यवहार पॅन कार्डशी लिंक असल्यानं आयकर विभागाची करडी नजर असते, असा सल्ला टॅक्स एक्सपर्ट यतेंद्र खेमका यांनी दिलाय. सध्या तुम्ही कर भरण्यापासून सुटका करून घ्याल, मात्र, भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता दंड भरून चिंतामुक्त होणं यातच शहाणपणा आहे.

संबंधित बातम्या

संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नफा कमावण्याची संधी, एचडीएफसी लवकरच आणणार देशातील पहिला डिफेन्स फंड

राज्यात इंधन दरवाढीचा भडका; सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये

‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.