WhatsApp : मनमोराचा पिसारा फुलणार! Private Chats चे टेन्शन सोडा, आलेय फिचर खास

WhatsApp : व्हॉट्सॲपने जोरदार फिचर्स आणले आहे. तासनतास चॅटिंग करणाऱ्यांना याचा फायदा होईल, काय आहे हे नवीन फिचर?

WhatsApp : मनमोराचा पिसारा फुलणार! Private Chats चे टेन्शन सोडा, आलेय फिचर खास
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 7:56 PM

नवी दिल्ली : व्हॉट्सॲपवर (WhatsApp) अनेक जण तासनतास चॅटिंग करतात. पण खासगी चॅटिंग लिक होऊ नये, याची वापरकर्त्यांना कोण भीती असते. कंपन्यांतील करारसंबंधीची प्राथमिक बोलणी असो वा प्रेमीयुगलांची गुलूगुलू असो चॅटिंग लिक होऊ नये याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागते. या खासगी चॅटविषयी व्हॉट्सॲपने खास फिचर (Special Feature) आणले आहे. तासनतास चॅटिंग करणाऱ्यांना याचा फायदा होईल. त्यांना मोठ्या धोक्यापासून आता स्वतःच वाचता येईल. काय आहे हे नवीन फिचर?

नवीन फिचरची घोषणा मेटाने व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरची घोषणा केली आहे. या फिचरचा वापरकर्त्यांना दीर्घ कालावधीपासून प्रतिक्षा होती. बीटा व्हर्जनवर कंपनी अनेक दिवसांपासून या फिचरची चाचणी करत होती. आता हे फिचर युझर्ससाठी लाईव्ह करण्यात आले आहे. हे फिचर युझर्सच्या चॅट सिक्युरिटीसाठी आहे.

काय आहे फिचर व्हॉट्सॲपवर एंड टू एंड एन्क्रिप्शन मिळते. पण घरातील सदस्य, मित्र यांच्या हातात तुमचा मोबाईल लागला. तो अनलॉक असला तरी तुमचे चॅट तो वाचू शकतो. स्क्रीन शॉटसह ते शेअर करु शकतो. त्याचा गैर फायदा घेऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअपने हे नवीन संरक्षण देणारे फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही कोणतेही चॅट लॉक करु शकता.

हे सुद्धा वाचा

असा होईल फायदा WhatsApp Chat Lock हे फिचर वापरकर्त्यांसाठी उपयोगात येईल. या फिचरच्या मदतीने युझर्स कोणताही ग्रुप अथवा वैयक्तिक चॅटिंग लॉक करु शकतो. या फिचरमुळे तुमची चॅटिंग केवळ तुम्हालाच एक्सेस करता येईल. त्यात इतर कोणाला ढवळाढवळ करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोबाईलचा पिन वा बायोमॅट्रिक लॉकचा वापर करता येईल. हे फिचर फिंगरप्रिंट लॉक, फेस लॉक याचा वापर करता येईल.

सातत्याने या क्रमांकाचा वापर या अनोळखी क्रमांकावरुन सातत्याने कॉल, एसएमएस येत आहेत. वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे व्हॉट्सअपने हे आंतरराष्ट्रीय क्रमांक जाहीर केले आहेत. वापरकर्त्यांनी त्यापासून सावध रहावे. यामध्ये +251 (इथिओपिया), +60 (मलेशिया), +62 (इंडोनेशिया), +254 (केनिया) आणि +84 (व्हिएतनाम) या क्रमांकापासून सुरुवात होणाऱ्या कॉल आणि एसएमएसचा भडिमार आहे.

असा करा वापर

  1. सर्वात अगोदर WhatsApp उघडा
  2. ग्रुप अथवा वैयक्तिक चॅटवर जा
  3. ग्रुपच्या नावावर टॅप करा
  4. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर शेवटी Lock Chat हा पर्याय दिसेल
  5. पासवर्डसाठीचा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल
  6. या पद्धतीने तुम्ही चॅट लॉक करु शकता

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.