जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; ‘या’ भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; ‘या’ भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Harshada Shinkar | Updated on: Feb 06, 2023 | 9:17 AM

राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधान भोवणार? कोणी केली 10 लाख रुपये इनाम देण्याची घोषणा?

जालना : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. हे विधान आव्हाड यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहे. अशातच आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्याने खळबळजनक घोषणा केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख रूपयांचा इनाम देण्यात येईल, असे भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ते विधान का केलं, कोणत्यासंदर्भात केलं हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ काल जळगाव, जालन्यामध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.

Published on: Feb 06, 2023 9:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us