Marathi News Videos 3 Arrested by NIA and ATS after raid in Chhatrapati Sambhajinagar Jalna and Malegoan know what happened

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई, तरूणांना घेतलं ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना येथे NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा ) आणि ATS ने संयुक्त कारवाई केली आहे. NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांनी काही तरूणांना ताब्यात घेतलं आहे.
छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालना येथे NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा ) आणि ATS ने संयुक्त कारवाई केली आहे. NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांनी काही तरूणांना ताब्यात घेतलं आहे. या तरूणांचा देशविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याचा संशय असून NIA आणि ATS कडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. NIA ने कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही छत्रपती संभाजीनगर, मालेगावमधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
आज छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागामध्ये कारवाई करण्यात आली. तर जालना आणि संभाजीनगरमधून 3 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले हे तरूण देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आहे.
Published on: Oct 05, 2024 9:47 AM
Related Video
इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत 'ही' कंपनी ठरली नंबर 1
साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधाना रचणार इतिहास, नंबर 1 होण्याची संधी
मोदींना मानलं, युरोप दौऱ्यात स्लोवाकिया या छोट्या देशात का जाणार?
दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने काय होते? उत्तर वाचून अनेकजण करतात
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा