VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 15 May 2022

| Updated on: May 15, 2022 | 10:31 AM

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला एका शिवसैनिकांने विचारलं साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? म्हटलं थोडासा पाहिला, का रे? त्यात नाही तो संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं मग, त्यावर तो म्हणतो तशी एक केस आहे आपल्याकडे. ती नाही का, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात.

Follow us on

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला एका शिवसैनिकांने विचारलं साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? म्हटलं थोडासा पाहिला, का रे? त्यात नाही तो संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं मग, त्यावर तो म्हणतो तशी एक केस आहे आपल्याकडे. ती नाही का, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? तो म्हणाला तसं नाही… चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है… तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा पिक्चर सत्य घटनेवर आधारीत आहे. असे अनेक मुन्नाभाई फिरतात फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचं आहे जाऊ द्या’.