VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 22 October 2021

| Updated on: Oct 22, 2021 | 12:28 PM

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. मात्र, आता ही बंधने शिथील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

Follow us on

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. मात्र, आता ही बंधने शिथील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पुणेकरांकडून होत होती. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, असं पवार यांनी सांगितलं.