5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा लागणार?
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना तीन राज्यांत सत्तांतर होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर, तामिळनाडूमध्येही मोठा राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना तीन राज्यांत सत्तांतर होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर, तामिळनाडूमध्येही मोठा राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार कामगिरी करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय केला आहे. थलपतीसमोर डीएमके आणि एआयडीएमके पक्ष मागे पडले असून, टीव्हीके बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जयललिता यांच्यानंतर तामिळनाडूत पुन्हा एकदा एका अभिनेत्याचा राजकीय उदय होत असल्याचे चित्र दिसत आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे असून काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे राज्यात सत्तांतर निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे. तर पुदुच्चेरीत एआयएनआरसी आणि भाजप युतीने पुन्हा एकदा बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एन. रंगासामी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे.
