Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

| Updated on: Aug 23, 2026 | 10:46 PM

मुलांनी फक्त स्क्रीनवर नाही मैदानावर सुद्धा दिसायला हवं असं फडणवीसांनी म्हटलंय. जास्तीत जास्त मुलांना मैदानावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असं फडणवीसांनी म्हटलंय. तर मुलांसाठी मैदानं तुम्ही ठेवताय कुठे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या वाटपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, मागची एसआरए भूखंड तुमच्या मित्रांच्या घशात टाकली आहे. तसेच, […]

मुलांनी फक्त स्क्रीनवर नाही मैदानावर सुद्धा दिसायला हवं असं फडणवीसांनी म्हटलंय. जास्तीत जास्त मुलांना मैदानावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असं फडणवीसांनी म्हटलंय. तर मुलांसाठी मैदानं तुम्ही ठेवताय कुठे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागांच्या वाटपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, मागची एसआरए भूखंड तुमच्या मित्रांच्या घशात टाकली आहे. तसेच, बाजूचा भूखंड तुमच्याच आमदाराच्या घशात टाकलेला आहे. अंधेरी आणि जुहू येथील तीन भूखंड भाजपचे आमदार असूनही, तुम्ही त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या आमदाराच्या घशात घातल्याचे ठाकरे म्हणाले. या सगळ्या ठिकाणी स्थानिक नागरिक, एएलएम्स (ऍडव्हान्स लोअर मॅनेजमेंट) विरोध करत आहेत आणि हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे, असेही ठाकरेंनी नमूद केले. फडणवीसांच्या आवाहनानंतर, मुलांसाठी मैदाने उपलब्ध करून देण्याऐवजी ती कमी केली जात असल्याचा ठाकरेंचा आरोप आहे.

Published on: Aug 23, 2026 10:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us