Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Nov 04, 2026 | 4:39 PM

आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे लक्ष वेधत, आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अटी-शर्ती का? असा सवाल त्यांनी केला. दुष्काळ, कर्जमाफीतील त्रुटी आणि लाडकी बहिणी योजनेतील वगळणी यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असताना, सरकार त्यांना पुरेशी मदत देत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. “आमदार-खासदार विकत घेण्यासाठी खोक्यांच्या खोक्यांनी पैसे वापरले जातात, पण शेतकऱ्यांना मदत करायची वेळ येते तेव्हा मात्र शेकडो अटी-शर्ती लादल्या जातात,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे यांनी सरकारवर आश्वासनं देऊन फसवणूक केल्याचाही आरोप केला. लाडकी बहिणीसारख्या योजनांमधून लाखो भगिनींना वगळण्यात आले असून, अनेक ठिकाणी रेशनकार्ड बंद केली आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकताना ठाकरे यांनी सरकार केवळ घोषणा करत असल्याचा आणि प्रत्यक्ष मदत पोहोचवत नसल्याचा दावा केला. आगामी काळात दुष्काळाची भीषणता वाढणार असल्याने, केवळ कृषी विभागच नव्हे, तर उद्योग विभागानेही रस्त्यावर येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

Published on: Nov 04, 2026 4:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us