Vidhan Parishad Election | भाजपवर हल्लाबोल अन् आता मंत्रीपदावर दावा; सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत पुन्हा खळबळ
राज्यातील राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजप मित्रपक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीतील समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यातील राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजप मित्रपक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीतील समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आता अब्दुल सत्तार यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मंत्री होण्याची अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नसल्याचे सांगितले. “मी निवडून आलेला आमदार आहे. त्यामुळे मंत्रीपदाची अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. माझ्या भावना मी पक्ष नेतृत्वाकडे मांडल्या आहेत. मंत्रीपद द्यायचे की नाही, याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल,” असे सत्तार म्हणाले.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्यावर मंत्रीपदासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना सत्तार यांनी सांगितले की, “आपल्या नेत्यांसमोर भावना व्यक्त करणे आणि मंत्रीपद मागणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला मंत्री करायचे की नाही, हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा आहे. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी द्यायचे ठरवले तर त्यात काहीही गैर नाही.” सत्तार यांनी पुढे सांगितले की, मंत्रीपद देण्याचा अधिकार पक्ष नेतृत्वाकडे आहे. “राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मी यापूर्वीही मंत्री राहिलो आहे. त्यामुळे मंत्रीपद माझ्यासाठी नवीन नाही. पक्षाला माझ्यामुळे फायदा होत असेल आणि नेतृत्वाचा विश्वास असेल, तर मंत्रीपद मिळण्यात गैर काहीच नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना अधिक जोर आला असून, महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. आगामी काळात मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यास सत्तार यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 04, 2026 02:17 PM
भाजपवर हल्लाबोल अन्.... सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत खळबळ
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन्
महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा

