VIDEO : तुझ्या xxx किती दम, ये ना मी एकटाच, तुझ्यासारखी कुत्री… विधानभवनाच्या गेटवर पडळकर-आव्हाडांमध्ये बाचाबाची
आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांचा विधानभवनाच्या गेटवर वाद झाला. पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
विधानभवनाच्या गेटवर आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मोठा वाद झाला. या वादात दोन्ही आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे विधीमंडळ परिसरात उभे होते. दोघांच्या भेटीदरम्यान, पडळकरांची गाडी विधीमंडळ परिसरात आली. जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख हे उभे असताना त्यांना पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागला, असा दावा करण्यात आला. दरवाजा लागल्यानंतर यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि शिवीगाळही झाल्याचे पाहायला मिळालं.
गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांना “कुत्री घेऊन फिरणारा” अशा शब्दांत उद्देशून शिवीगाळ केली. एकटाच आहे मी.. तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही, असं म्हणत पडळकरांनी शिवीगाळ केली. तर यावर मी कोण आहे दाखवू का तुला असं म्हणत आव्हाडांनी पलटवार केला. दोन्ही आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
