Varsha Bungalow | अजित पवारांच्या खात्यांचा प्रश्न ऐरणीवर: राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती होती. ती राष्ट्रवादीलाच मिळावी या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले.
अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती होती. ती राष्ट्रवादीलाच मिळावी या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील बाबींवर चर्चा करणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली तिन्ही खाती राष्ट्रवादीकडेच राहावी, अशी स्पष्ट मागणी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या तर्फे एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले जाणार आहे, असे देखील सूत्रांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या खाती कोणाकडे जावी, याबाबत राज्यात चर्चांना जोर आला आहे.
