अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप

अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप

| Updated on: Aug 28, 2026 | 10:33 PM

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे घडलेल्या अ‍ॅडव्होकेट रियाज पठाण हत्या प्रकरणात तब्बल 13 वर्षांनी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर सबळ पुराव्याअभावी इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ही घटना 16 सप्टेंबर 2013 रोजी घडली होती, जेव्हा अ‍ॅडव्होकेट रियाज पठाण यांच्यावर दिवसाढवळ्या […]

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे घडलेल्या अ‍ॅडव्होकेट रियाज पठाण हत्या प्रकरणात तब्बल 13 वर्षांनी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर सबळ पुराव्याअभावी इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

ही घटना 16 सप्टेंबर 2013 रोजी घडली होती, जेव्हा अ‍ॅडव्होकेट रियाज पठाण यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला, ज्यानंतर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला.

Published on: Aug 28, 2026 10:33 PM
Follow Us