बारामतीतही गुन्हा दाखल करण्यास नकार! रोहित पवारांच्या आरोपांनंतर CID मैदानात!

बारामतीतही गुन्हा दाखल करण्यास नकार! रोहित पवारांच्या आरोपांनंतर CID मैदानात!

| Updated on: Feb 27, 2026 | 10:28 AM

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी मुंबईपाठोपाठ बारामतीतही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. रोहित पवारांनी यामागे घातपाताची शक्यता व्यक्त करत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे, तर सीआयडीने तपास योग्य दिशेने सुरू असून घातपात, निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कृत्य अशा तिन्ही पैलूंनी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास मुंबईपाठोपाठ बारामती पोलिसांनीही नकार दिला आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी थेट बारामती पोलीस ठाणे गाठले होते. रोहित पवारांनी अपघात केवळ तांत्रिक नसल्याचा आरोप करत यामागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी डीजीसीए आणि विमान कंपनी व्हीएसआर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, सीआयडीकडून तपास सुरू असल्याने गुन्हा दाखल करता येत नाही, असे पोलिसांनी पवारांना सांगितले.

या प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत सांगितले की, तपास घातपात, निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कृत्य अशा तिन्ही दृष्टीने सुरू आहे. एआयबीचा अहवालही विचारात घेतला जात आहे. दुसरीकडे, रोहित पवारांनी एफआयआर दाखल न होण्यामागे मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणात महायुती सरकारमधील नेत्यांमध्येही मतभेद दिसून येत आहेत.

Published on: Feb 27, 2026 10:28 AM
Follow Us